आज लोकसभा 2024 च्या दुसऱ्या टप्प्याच मतदान; देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात होणार मतदान

आज देशभरात दुसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण 12 राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
देशात दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3 आणि जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामधील 1 जागेचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरचा 1 भाग म्हणजे मणिपूर बाह्य सीट साठी आज मतदान होईल.
महाराष्ट्र राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे.
प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, नवनीत राणा कौर, महादेव जानकर यांचे भवितव्य आज EVM मशीन मध्ये कैद होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत