ईव्हीएमविरुद्ध सांकेतिक आंदोलन !

नागपूर : ज्या अर्थी लोकशाहीमध्ये भारतीय नागरिक हा सर्व परी आहे त्याच अनुषंगाने त्याची भारतीय ता कायम असावी व त्याने मतदान हे कोणास द्यावे हा त्याचा संविधानिक अधिकार आहे परंतु त्याने केलेले मतदान याची विश्वास हरता सध्याची ईव्हीएम मशीन ने हरवली असून ही त्याच्याशी केलेली बेमानी व गद्दारी आहे. याच अनुषंगाने ईव्हीएम मशीनला हद्दपार करावे व बॅलेट पेपर पुनश्च निवडणुकी प्रक्रियेमध्ये आणावे ही मागणी गेल्या 2018 पासून इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम च्या वतीने करण्यात आलेली होती सदरचे अभियान पुन्हा नवीन जोमाने चालवण्यासाठी रविवारी दीक्षाभूमी येथून सदर अभियानाचा आगाज करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या प्रतिनिधी व समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय समन्वयक अॅड. स्मिता कांबळे यांनी क्रांती भूमी दीक्षाभूमीतून या अभियानाचा आगाज केला आणि निवडणूक आयोगाला आवाहन केले कि ईव्हीएम हद्दपार करून बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेण्यात याव्या ही मागणी उचलून धरली जेणेकरून लोकांची विश्वासहर्ता कायम राहावी व लोकशाही या देशात प्रखरपणे नांदावी. यावेळी या सांकेतिक आंदोलन चे मार्गदर्शक अॅड. आकाश मून, विश्वास पाटील, राजेश लांजेवार, आनंद तेलंग, आनंद पिल्लेवान, राज सुखदेवे, शैलेश बोरकर, प्रशांत शेंडे, रुपेश पिल्लेवान, अजय बागडे, नंदकिशोर रंगारी, अरुण भारशंखर, अतुल जामगडे, अधिवक्ता मनोहर, आदेश प्रसेनजित सूर्यवंशी, भारत लोखंडे, अजय निमगडे, धनराज गजभिये, संजय बेले व असंख्य कार्यकर्ते सम्मिलित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत