दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

प्रा.मा.म.देशमुख म्हणजे बहुजनांच्या इतिहासातील सोनेरी पान !

 अभिजन यांनी जिवंतपणी प्रेतयात्रा त्यांच्या घरा समोरून काढली ,पण त्याची  पर्वा न करता बहुजन समाजाला सत्य इतिहास संशोधक म्हणून पटवून देणारे  इतिहास संशोधक मा. मा
.देशमुख यांची बहुजन समाजाने देखील प्रेम यात्रा काढली.भाषणात पाणी तापलं का असा प्रश्न विचारून पुरोगामी तरुणाची डोकी तापविणारे
मा. मा देशमुख ह्यांचे जीवन अगदी बीजासारखंच आहे.कारण “एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस..”हजारो दाणे असणारे कणीस मिळवायचे असेल तर आधी एका बीजाला स्वतःचा नाश करुन घ्यावा लागतो.त्या बीजाने स्वतःला जमीनीत गाडुन घेतल्यावरच त्याच्यातुन तयार होणारे कणीस त्या चालवत.
           इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख हे परीवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते असणारी कणसं तयार करण्याचे महान कार्य आहे.त्यांनी आपल्या राष्ट्रजागृती लेखमालेतुन मनुवादाची साल काढत नवीन परीवर्तनवादी लेखक,वक्ते  निर्माण केले.हे त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून नुसती नजर टाकली तर आपल्या लक्षात येते .● रामदास आणि पेशवाई ● मराठा-कुणबी समाजाची दशा आणि दिशा ● बहुजन समाज आणि परीवर्तन ● शिवराज्य ● मनुवाद्यांशी लढा ● राष्ट्रनिर्माते ● शिवशाही ● मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही ● मध्ययुगीन भारताचा इतिहास ● मराठ्यांचे दासीपुत्र: संपादित ● भांडारकर तो झाँकी है शनिवारवाडा अभी बाकी है ● जिजाऊ ● अभ्यास कसा करावा ? या व अशा अनेक विचारग्रंथांतुन तसेच आपली व्याख्याने,लेख,चर्चासत्र,प्रशिक्षण शिबीरांमधुन मनुवादी लेखकांनी लिहलेला खोटा इतिहास पुराव्यासहीत खोडुन काढण्याबरोबरच वैचारिक धन वाटण्याचे कार्य त्यांनी केले.
“रामदास हा आदिलशहाचा हेरच होता” हे त्यांनी आपल्या “रामदास आणि पेशवाई” मध्ये पुराव्यानिशी सिध्द केले.
        त्याचं पुस्तक प्रकाशित झालं की मनुवादी त्यावर कोर्टात  केस दाखल करून त्यांना कोर्टाच्या कचाट्यात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असले तरी प्रा.मा.म.देशमुख यांचा .ओठ वाचक वर्ग होता. त्यांचे कार्यक्रम पत्रिकेवर नाव पाहूनच त्यांच्या श्रोत्यांची मोठी गर्दी होत असे.त्यांनी बहुजन नायक मान्यवर यांच्या सभा गाजविल्या आहेत. वामन मेश्राम यांच्या बामसेफ
चे आयडॉल होते. त्यांनी “आचार्य अत्रे” पासुन ते अनेक मनुवादी लेखकांची तोंडे कायमची बंद करण्याचा पराक्रम केला आहे.हायकोर्टाने त्यांच्या  पुस्तकावरील बंदी उठवुन त्यांच्या  संशोधनावर शिक्कामोर्तब केले. आहे.पुण्यातील शनिवारवाडा हाच जिजाऊंचा खरा लालमहाल आहे असे पुराव्यासहीत संशोधन त्यांनी केले आहे.
मनुवादी लेखकांनी लपवलेला आणि इतिहासात शिवरायांवर तलवारीने वार करणारा अफजलखानाचा वकील सरांनी सर्वप्रथम आपल्या लेखणीतुन समाजासमोर आणला.
एके काळी तर मनुवाद्यांनी त्यांच्या  लेखनाची इतकी धास्ती घेतली होती की त्याचे  मुद्दे खोडता येत नाहीत म्हणुन त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याचाच प्रयत्न  केला.पण अंगात सुध्दा मराठ्याचं रक्त असल्याचे  मनुवादी  ओळखून होते. म्हणून त्याचा पानसरे करू शकले नाहीत.
        श्रोत्याची मनं जिंकण्याची किमया चांगलीच अवगतअसलेले देशमुख सर म्हणत की . “भिकाऱ्याला भिक देणे ही सेवा आहे परंतु त्या भिकाऱ्यावर भीक मागायची वेळच येणार नाही अशी स्थिती निर्माण करणे म्हणजे परीवर्तन होय”
हे परिवर्तन अभिजन सवर्ण ब्राह्मण यांना मान्य नाही.कारण बहुजन समाजाने नेहमीच् त्यांचे गुलाम राहिले पाहिजे हीच त्यांची धारणा असते.
ती मोडीत काढण्यासाठी त्यांनी बुद्ध सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता मूलक विचाराचे पेरणी करून महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकविले .पण सध्या एक आनाजी पंथ ईडी सीबीआय , आणि शासकीय ससेमिरा लावून पुरा महाराष्ट्र नसावीत आहे.त्याला मराठे मावळे बळी पडून लोकशाहीच उद्वस्त करीत आहेत.त्यांना देशमुख सरांचा साहित्य साठा मोठा असल्याने वाचण्यास वेळ नसेल तर त्यांनी त्यांचे  व्हीडिओ सी.डी, अविद्येपेक्षा कुविद्या भयानक , आरक्षण भाग १ , आरक्षण भाग २: , कांशीराम, क्रांतिकारी
भाषण  ,  छत्रपती शिवराय , डॉ. पंजाबराव देशमुख , डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज , बौद्ध धम्म आणि शिवधर्म , ब्राह्मणी थोतांड , न्या. सावंत मुलाखत, आणि हिंदू राष्ट्रवाद  या व्हीडिओ सी.डी ऐकल्या नंतर आपण कोण सोबत आहोत .याची जाणीव होईल .
        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर विठ्ठल हा बुद्ध आल्याचे पाठवून देणारे देशमुख सर याच्या प्रबोधनाचे फळीत आता अनेक वारकरी विठ्ठलास बुद्ध म्हणून वारीत बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांची समता मूलक विचारधरा सांगत विद्रोही तुकाराम वैकुंठी गेले नाहीत तर त्यांची भट ब्राह्मण पुरोहित यांनी हत्या केल्याचे आपल्या प्रवचन मधून सांगून बहुजन समाजाचे डोळे उघडत आहेत.
    एकमेका संघटीत करु | अवघे बनु कृतीवंत | शिव-फुले-शाहू-भीमाचा मार्ग धरू | करु मनुवादाचा अंत ||
      मा. मा.देशमुख  यांनी आपल्या साहित्य आणि व्याख्यानातून समतेची क्रांतीची पेरणी केली.त्यामुळे समाजसेवा आणि समाजपरीवर्तन यातील व्याख्या उलगडुन सांगुन परीवर्तनासाठी आग्रही कार्यकर्ते तयार करण्याचा मान त्यांना जातो.मा.म.देशमुख यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.जनतेचा महानायक सुनील खोब्रागडे यांनी रोख 50 हजार रुपये देऊन त्यांना जीवन गौरव पुरस्काराणे सन्मानित केले होते.त्यावेळी त्यांनी पुरोगामी पत्रकारिता आणि पुरोगामी मिडिया बदल फार मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.मा. मा.देशमुख  
म्हणजे  मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.ज्यांनी कधीच आत्मा स्वर्ग ,पाप पुण्य , गाय  माता मानली नाही .असे विज्ञानवादी समाज सुधारक पुरोगामी महाराष्ट्रातून जाण्याने  साहित्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांना अखेरचा निळा सलाम ! आणि भावपूर्ण आदरांजली !!

आनंद म्हस्के आंबेडकरी साहित्यिक
8652325032

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!