संविधान रक्षणाची जबाबदारी सर्व लोकशाहीवादी भारतीयांची – प्रा. डॉ. सुरेश वाघमारे

लातूर : भारतीय संविधान हे डॉ बाबासाहेब यांनी भारताला दिलेली देणगी या भारतीय संविधानमुळेच आज आपल्या देशाची एकता आणि अखंडता टिकून आहे अनेक धर्माचे जातीचे विविध भाषा बोलणारे लोक एकत्रित राहतात संविधनामुळेच लोकशाही जिवंत आहे त्यामुळे संविधान रक्षणाची जबाबदारी कुणा एका जाती धर्माची किंवा कुणा एका राजकीय पक्षांची नाही तर सर्व लोकशाहीवादी भारतीयांची आहे असे प्रतिपादन डॉ सुरेश वाघमारे यांनी केले. एम आय टी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते?
या वेळी विचार पिठावर प्रा डॉ बापू गायकवाड, ॲड मंचकराव डोणे हे होते. पुढे बोलताना डॉ वाघमारे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील भाषणात म्हणाले होते की जात धर्म आपले पुराने शत्रू आहेत पणं भविष्यात सांप्रदायिक पक्षाची भर पडली आणि या देशातील तरुणांनी लोकशाही ऐवजी तो पक्ष महत्वाचा मनाला तर लोकशाही धोक्यात येईल अशा वेळी सर्वांनी सज्ज राहून आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटची थेंब आम्ही लोकशाहीचे रक्षण करू असा निश्चय केला पाहिजे नाहीतर हा देश नष्ट होईल डॉ आंबेडकर यांच्या विचारांचा विचार करण्याची वेळ आली आहे.
या प्रसंगी प्रा डॉ बापू गायकवाड ॲड मंचकराव डोणे यांनी पणं आपले विचार मांडले. त्याच प्रमाणे यावेळी डॉ प्रतीक्षा रामटेके डॉ संघमित्रा वाव्हूल डॉ सुमित्रा शेगावकर डॉ श्रीकांत कुहुलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी डॉ भालशंकर सर डॉ दीप्ती वानखेडे झेड एस सोनवणे सुमन कांबळे सौ लता वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ ब्रह्मानंद हणमंते डॉ शुभाली सोनकांबळे डॉ सोहम सोनकांबळे डॉ मारुती नाईक यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रतीक्षा रामटेके यांनी केले तर डॉ विजय वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी एम आय टी मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत