महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या जिल्हाध्यक्षांची निवड

डॉ. गौतम पांडुरंग गोसावी यांचे कडून
रिपाई महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गौतम पां. गोसावी यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांची निवड वरिष्ठांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई साहेब यांनी निवडलेल्या जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन व कौतुक केले असून माजी राज्यपाल स्वर्गीय दादासाहेब गवई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व निवड झालेले जिल्हाध्यक्ष उपेक्षित व वंचित घटकांसाठी काम करतील अशी अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक श्री. चंद्रकांत केरु वाघमारे यांची निवड रिपाईचे महाराष्ट्र निवडणूक अधिकारी डॉ. गौतम पां. गोसावी यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. तसेच श्री. चंद्रकांत वाघमारे यांचे सर्व राजकीय स्तरांवर कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे
आपला विश्वासू
डॉ. गौतम पांडुरंग गोसावी महाराष्ट्र निवडणूक निर्णय अधिकारी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत