” बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन.!”

पुन्हा एकदा दिलीय हाक,
घेण्या हात हातात,
हमखास फुलणार, मळा भीमाचा,
दिलाय नारा एकजुटीचा,
पुन्हा एकदा दाखवून देऊ,
भिनलेला विचार, आंबेडकरवादाचा,
एकजुटीच्या वज्रमूठीचा,
घेऊनी ताबा,
बुद्धगया महाबोधी विहाराचा.!
कल्पनेने एकजुटीच्या ,
नाचू लागलंय समाजमन, आनंदात,
पुन्हा पल्लवीत, झालीय आशा,
भीमानुनयांत,
झटकून मरगळ, आलाय बहर,
बाबांच्या लेकरांत.!
झटक्यात नष्ट झालीय,
सुस्ती मनाची,
फाटाफुटीची, आपसातील वैराची,
गटातटात विखरून गेल्याची,
चळवळीची वाताहात, पाहण्याची,
अन उर्मी आलीय,
बेधुंदीने नाचण्या, बागडण्याची.!
परंतु विनंती एकच,
सकल महारथीना, समाज धुरिणांना,
नका करू नाराज, पुन्हा पुन्हा,
बाबांच्या लेकरांना,
नका देऊ वाव, पुन्हा फाटाफुटीला,
आपापसातील वादावादीला,
हाती धरून झेंडा, धम्माचा,
निश्चित घेऊ ताबा,
बुद्धगया महाबोधी विहाराचा.!
निश्चित घेऊ ताबा,
बुद्धगया महाबोधी विहाराचा.!!
निश्चित घेऊ ताबा,
बुद्धगया महाबोधी विहाराचा.!!!
अरुण निकम.
9323249487.
मुंबई.
दिनांक…09/09/2025.
टीप. उद्या दिनांक 10/09/2025 रोजी मुंबई येथे आंबेडकरी पक्ष, संघटना, धम्म संघटना ह्यांच्या महाबोधी विहार मुक्त करण्याच्या आंदोलनाला अधिक चालना मिळावी. ह्या निमित्ताने होत असलेल्या बैठकी निमित्ताने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत