पालघर : चिंचपाडा – वाडा या बसचा अपघात, ४७ विद्यार्थ्यांसह ८ प्रवासी जखमी
आज शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळी पावणेसात वाजता चिंचपाडा – वाडा या बसचा एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला धडक बसल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात ४७ विद्यार्थी व ८ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये विद्यार्थ्यांसह ७० प्रवासी होते.
चिंचपाडा येथून सकाळी सव्वासहा वाजता ही बस वाड्याच्या दिशेने येत होती. वाडा येथील पी.जे. हायस्कूल व स्वामी विवेकानंद या दोन्ही माध्यमीक शाळांची वेळ सकाळीच असल्याने चिंचपाडा, पीक, शिलोत्तर, देवळी, मानिवली या परिसरातील ५६ शालेय विद्यार्थी या बसमधून प्रवास करीत होते. या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य १४ प्रवासी या बसमध्ये होते. वाड्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देसई नाका येथील वळणावर हा अपघात झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत