
आज मुंबईत गोरेगाव इथे महाराष्ट्र पोलीस दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र पोलीस दलाने नागरिकांना सुरक्षा देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलंत. पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार काढून राज्यपालांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस आणि बँड पथक सहभागी झाले. सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केलं आणि शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण आणि प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत