
वरिष्ठ आयपीएस अधिकारी नीना सिंह यांना 29 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीतील CISF मुख्यालयात जवानांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. नीना सिंह या CISF च्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत. CISF च्या महासंचालकपदी नीना सिंह यांची नियुक्ती म्हणजे या केंद्रीय दलाच्या इतिहासातील मैलाचा दगड असल्याचं CISF ने म्हटले. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी (28 डिसेंबर) केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या नवीन महासंचालकांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी नीना सिंह यांची सर्वाधिक चर्चा झाली आहे. नीना सिंह या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत.
आयपीएस अधिकारी नीना सिंह यांनी दिल्लीतील CISF मुख्यालयात महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. असा आहे नीना सिंह यांचा प्रवास
1969 मध्ये स्थापन झालेल्या CISF ला 54 वर्षांनंतर पहिल्या महिला महासंचालक मिळाल्या आहेत.
नीना सिंह 31 जुलै 2024 रोजी सरकारी सेवेतून निवृत्त होणार आहेत.
नीना सिंह यांनी 2021 मध्ये CISF मध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केलं आहे.
महासंचालक पदावर नियुक्तीचे आदेश जारी होण्यापूर्वी त्या CISF मध्ये विशेष महासंचालक पदावर कार्यरत होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत