निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

बारामतीतले षडयंत्र –

डॉ. विनय काटे

सौ. सुप्रिया सुळे ह्या बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हावर अर्ज लढत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी “तुतारी” हे चिन्ह सोयल शहा युनूस शहा ह्या अपक्ष उमेदवाराला दिले आहे.

भारतातील ट्रेडमार्क कायद्यानुसार एखाद्या कंपनीचा लोगो किंवा ट्रेडमार्क याच्यासारखे दिसणारे किंवा उच्चार समान असणारे लोगो व ट्रेडमार्क त्या कंपनीची स्पर्धक कंपनी नोंदवू शकत नाही… त्याला deceptively similar किंवा phonetic similarity हे कारण देवून नाकारले जाते… जेणेकरून ग्राहकांची फसवणूक टाळावी.

इथे मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही चिन्हे… ज्यात तुतारी समान आहे, फक्त वाजवणार माणूस असणे नसणे एवढाच फरक आहे… ही deceptively आणि phonetically सारखी दिली आहेत. याने मतदारांचा गोंधळ नक्की उडणार आहे की सुप्रिया सुळेंचे चिन्ह नेमके कोणते?

याहीपुढे जाऊन अजून एक भयानक गोष्ट ही आहे की त्या अपक्ष उमेदवाराचे नाव “सोयल शहा युनूस शहा” आहे. EVM वरती उमेदवारांचा क्रम जो ठरतो त्यात राष्ट्रीय पक्ष, राज्यातील पक्ष आणि नंतर अपक्ष उमेदवार असा प्राधान्य क्रम असतो … ज्यात पुढे परत नावाच्या स्पेलिंगनुसार क्रम असतो. यावेळी निवडणूक आयोगाच्या लेखी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला राज्यातील पक्षाचा दर्जा नसल्याने सुप्रिया सुळे यांचे नाव अपक्ष उमेदवारांच्या क्रमात येईल.

“सोयल शहा युनूस शहा” आणि “सुप्रिया सुळे” ही नावे स्पेलिंग पाहिली तर सोयल शहा ह्या उमेदवाराचे नाव सुप्रिया सुळेंच्या अगदी वर EVM मशीनवर दिसेल. मतदार जेव्हा यादी शोधतील तेव्हा बहुतांश मतदार पहिल्यांदा फक्त तुतारी चिन्ह दिसल्यावर त्यालाच सुप्रिया सुळेंचे चिन्ह समजून मत देतील, प्रत्यक्षात ते सोयल शहा यांचे चिन्ह असेल. यात सुप्रिया सुळे यांची बहुतांश मते चुकीच्या उमेदवाराच्या खात्यात जातील.

फसवणारे चिन्ह आणि जवळच्या स्पेलिंगचा उमेदवार या दोन्ही गोष्टी एकत्र करून सुप्रिया सुळेंना पाडायचा डाव किती मोठा आहे हे लक्षात येईल. यंत्रणा इतक्या लाचार झाल्याचे यापूर्वी कधी मी तरी पाहिले नाही!

  • डॉ. विनय काटे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!