संविधान बदल हे प्रगतीचं प्रतिक असून त्यामध्ये वाईट काहीच नाही – भाजपा उमेदवार अरुण गोवील

मेरठ – भाजपाचे मेरठ मतदारसंघातील उमेदवार आणि रामायण मालिकेमुळे घराघरात पोहचलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण गोवील यांनी सोमवारी एका प्रचार सभेत बोलताना भारतीय संविधानात बदल करणे कसे चांगले आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशमधील फैजाबादमधील विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार लालू सिंह यांनी भारतीय संविधानात बदल करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन निर्माण झालेल्या वादात गोयल यांनी भर टाकली आहे.
आम्हाला दोन तृतीयांश मताधिक्य मिळाल्यास आम्ही संविधानामध्ये बदल करु किंवा नवीन संविधान बनवू अशा अर्थाचं विधान लालू सिंह यांनी केलं होतं. “सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदार पुरेसे आहेत. मात्र संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन तयार करायचं असेल तर आपल्याला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमतं मिळालं पाहिजे,” असं लालू सिंह कुंदरखा कालन गावामधील चौपालदरम्यान म्हणाले होते.
यावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी “संविधानामध्ये सुधारणात्मक बदल करणे आणि मूलभूत बदल करणे या दोन्ही गोष्टींमध्ये फरक न कळणाऱ्या व्यक्तीला तिकीट देऊन भाजपाने मोठी चूक केली आहे” असं परखड मत व्यक्त केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत