दोन महिन्यांत दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या; छगन भुजबळयांची मागणी

कुणबी दाखले तपासण्याची मराठवाड्यापुरती मागणी महाराष्ट्रभर करण्यात आली. आता सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी होत असून ते दिलेही जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केली.
मराठा नेते आता गप्प का? मनोज जरांगे पाटील यांना मोठे केले आणि आता त्यांना खाली कसे खेचायचे, असा प्रश्न मराठा नेत्यांना पडला असल्याची टीका करत भुजबळ यांनी ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले.
इंदापूर येथे ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या मेळाव्यात मंत्री भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, या भागातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, काकडे, जाचक यांना विचारा कुणबी दाखला हवा का? आणि नको असल्यास पुढे येऊन सांगा. निवडणुकीत मते मिळणार नाहीत म्हणून मोठे नेतेही बोलत नाहीत. सरसकट कुणबी दाखले दिल्यास मराठा शिल्लकच राहणार नाही, याबाबत मराठा विचारवंतांनी पुढे यावे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्याकडे २० टक्के, तर आमच्याकडे ८० टक्के मते आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत