नाशिक जिल्ह्यामध्य धावत्या शिवशाहीला लागली भीषण आग.

रविवारी (दि. १०)दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील चांदोरी नजीक शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर
धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागली.या दुर्घटनेत बस मधील पाच ते सहा प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शिवशाही बस (क्रमांक एम एच ०९, एफ एल ०४७७) ही नाशिकहून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना धावत्या बस मधून इंजिनच्या बाजूने धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तत्काळ बस थांबवली व बस मधील पाच ते सहा प्रवासी घाईने खाली उतरले, त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला व या आगीत ही संपूर्ण बस जळून खाक झाली.
आगीच्या या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली, मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले,. दरम्यान या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत