मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन “नवीन पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देणे या बाबतचा निर्णय न्याय देणारा असेल”

महासंघाने पुकारलेल्या १४ डिसेंबरचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले असल्याची माहीती मिळाली आहे. तसेच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सुबोध कुमार समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून, हा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासित केल्यानुसार जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह नवीन पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देणे या सर्वाबाबत न्याय देणारा असेल, असा आशावाद या बैठकीत महासंघाच्यावतीने करण्यात आल्याचे कुलथे यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत