
निकालाला आठवडा उलटून गेल्यानंतरही राजस्थानला मुख्यमंत्री मिळालेला नाही. राजस्थानातील मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बहुमत मिळवलं. सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी जनतेनं कायम राखली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेत आणणाऱ्या मतदारांनी यंदा भाजपला भरभरुन मतदान केलं. विधानसभेच्या १९९ पैकी ११५ जागा जिंकत भाजपनं काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य खेचून घेतलं. मात्र आठवडा उलटूनही भाजपला राजस्थानचा मुख्यमंत्री निवडता आलेला नाही. भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. पण भाजप नेतृत्त्वानं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी घेतलेला वेळ पाहता यंदा राजस्थानचं नेतृत्त्व नव्या चेहऱ्याकडे दिलं जाण्याची दाट शक्यता आह. तर दुसरीकडे सिंधिया यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे वर्षभरासाठी मुख्यमंत्रिपद मागितलं आहे. एक वर्षासाठी मुख्यमंत्री करा. त्यानंतर मी स्वत: हे पद सोडेन, असं सिंधिया यांनी पक्ष नेतृत्त्वाला सांगितलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत