विविध कारणांमुळे २६२ कैद्यांचीसुटका

‘न्याय सबके लिए’ हे ब्रीदवाक्य घेऊन वर्षानुवर्षे केवळ आर्थिक व तांत्रिक बाबींमुळे तुरुंगात खितपत पडलेल्या तुरुंगातील कैद्यांच्या सुटकेसाठी- त्यांच्या न्याय हक्कासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘अंडरट्रायल रिव्ह्यू कमिटी स्पेशल कॅम्पेन’ अभियान राबविण्यात आले होते. यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ‘अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी’ गठित करण्यात आली होती. या समितीच्य माध्यमातून ठाणे कारागृहातील कैद्यांसाठी हे विशेष अभियान राबविण्यात आले होते. या कालावधीत आर्थिक दुर्बलतेमुळे वकिलांची नियुक्ती करणे शक्य नसल्याने अनेक कैदी वर्षानुवर्षे गजाआड होते. कारागृहात कैद्यांची संख्या अधिक होत असल्याने ठाणे जिल्ह्यातील कारागृह यंत्रणेवर अधिक ताण येत होता. तसेच कैद्यांनादेखील अनेक वर्षे खितपत पडून राहावे लागत होते. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे बंदी पुनर्विलोकन समिती विशेष अभियान राबविण्यात आले होते. या माध्यमातून मोफत विधि साहाय्य पुरवण्यात आले असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध कारागृहांतून २६२ कैद्यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.यामुळे कारागृह क्षमतेपेक्षा जास्त बंदी कारागृहात असल्याने कारागृह प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला होता. या सर्व बाबींचा विचार करून अशा न्यायाधीन कैद्यांना या मोहिमेअंतर्गत विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयात स्थापन केलेल्या बचाव पक्षप्रणालीच्या माध्यमातून मोफत विधि साहाय्य पुरवण्यात आले. या अभियानात अशा तांत्रिक व आर्थिक बाबींमुळे २६२ कैद्यांची सुटका करण्यात आलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत