दोन डॉक्टरांसह नऊ जणांना अटक करून राज्यात स्त्री- भ्रूण हत्येचे सर्वात मोठे प्रकरण आणले उघडकीस.

स्त्री- भ्रूण हत्येचे सर्वात मोठे प्रकरण उघडकीस आणले असून यामध्ये दोन डॉक्टरांसह नऊ जणांना अटककरण्यात आली आहे, अशी माहिती बंगळूर शहराचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी मंगळवारी दिली. या टोळीने अवघ्या तीन महिन्यांत २४२ भ्रूणहत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
बी. दयानंद म्हणाले, ‘‘महिलांच्या बेकायदेशीर गर्भलिंग चाचण्या घेतल्या. स्त्री-भ्रूण हत्या केली. याप्रकरणी बालरोगतज्ज्ञ, ज्याची आई देखील एक डॉक्टर आहे आणि एक आयुर्वेद डॉक्टर हे या टोळीमागील मास्टरमाइंड आहेत. म्हैसूरच्या जिल्हा मुख्यालयातील उदयगिरी येथे त्यांचे रुग्णालय आहे.
१५ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणी दरम्यान, बायप्पनहळ्ळी पोलिसांनी संशयास्पदपणे फिरत असलेले वाहन थांबवले. पोलिसांनी रहिवाशांची चौकशी केली असता ते भ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे समोर आले. ही टोळी गर्भवती महिलांच्या गर्भलिंग चाचण्या करत तसेच स्त्री गर्भ असल्याचे निदर्शनास आल्यास ते नष्ट करायचे. आम्ही आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.
त्यापैकी दोन डॉक्टर, तीन लॅब टेक्निशियन किंवा हॉस्पिटलमधील कंपाउंडर, हॉस्पिटल मॅनेजर आणि रिसेप्शनिस्ट व्यतिरिक्त तीन दलाल आहेत. फरार असलेल्या दोन दलालांचा शोध सुरू आहे.’’ आरोपी हे प्रामुख्याने म्हैसूर आणि मंड्या जिल्ह्यातील आहेत. आयुर्वेद डॉक्टरची पत्नीही आरोपी आहे.
त्यांनी मंड्या जिल्ह्यातील दुर्गम खेड्यात गूळ उत्पादन युनिटमध्ये त्यांचे क्लिनिक चालवतात. गर्भपातासाठी तेथे आवश्यक असलेली सर्व उपकरणे होती. दोन वर्षांत त्यांनी ९०० हून अधिक स्त्री-भ्रूण हत्या केल्याचा संपवल्याचा संशय आहे. त्यांनी गर्भलिंग चाचणीसाठी २० हजार ते २५ हजार रुपये आणि गर्भपातासाठी अतिरिक्त ५० हजार रुपये घेत, असे दयानंद यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत