देश-विदेश
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत एच एस प्रणॉयचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
भारताच्या एचएस प्रणॉयनं चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत, त्यानं डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सनचा 21-12, 21-18 असा दोन सरळ गेम्समध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना आज जपानच्या कोडाई नरावका, याच्याशी होणार आहे.
पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी, अकिरा कोगा आणि ताईची सैटो या जपानच्या जोडीचा 21-15, 21-16 असा पराभव केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत