मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर करण्यात आला ‘हिंदूहृदयसम्राट’ उल्लेख
शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर टिका केली आहे. “ही भाजपाची नामुष्की आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना नरेंद्र मोदींना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. याआधी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदूहृदयसम्राट’ असा केला आहे. पण, तसा उल्लेख चुकीचा आहे अशी टिका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका होत आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची तुलना करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. तर, ही वाईट अवस्था आहे.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत