ना परीक्षा, ना हॉल तिकीट, थेट ‘नेट’ प्रमाणपत्रच.
काही स्वयंभू उच्च शिक्षितांनी बनावट राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) प्रमाणपत्र मिळविले आणि त्याआधारे गलेलठ्ठ वेतनाच्या प्राध्यापकाची नोकरी मिळविली. मात्र, हे प्रमाणपत्र ना परीक्षा, ना हॉल तिकीट थेट बनावट नेट प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या किती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांकडे असे बनावट प्रमाणपत्र आहे. या रॅकेटविरोधात कारवाईसाठी कोण पुढाकार घेणार,
याकडे आता नजरा लागल्या आहेत. राज्यपाल अथवा केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने बनावट नेट प्रमाणपत्रधारक असलेल्या १९ प्राध्यापकांची नावे महाविद्यालयांसह अमरावती विद्यापीठाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर यूजीसीने वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कला, विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक तथा सहयोगी प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २००४ मध्ये टी ४३२६८७ फिजिकल एज्युकेशन नेट परीक्षा प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवली, ते प्रमाणपत्र ‘फेक’ असल्याचे कळविण्यात आले आहे. आता याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश संबंधित महाविद्यालयांना देण्यात आले आहेत सुरेंद्र चव्हाण यांच्या बनावट नेट प्रमाणपत्रप्रकरणी धनज पोलिसात सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. उद्भव जाणे यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत