अंधेरीचा पादचारी पूल आजपासून बंद.

परविवार (ता. १९) पासून श्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकावरील फलाट क्रमांक चार व पाचला जोडणारा जुना पादचारी पूल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील २० दिवस प्रवाशांना इतर पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.अंधेरी रेल्वे स्थानकावरील कामासाठी पश्चिमेकडील फलाट क्रमांक चार व पाचमधील दक्षिणी (जुना) पादचारी पूल १९ नोव्हेंबरपासून २० दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत, प्रवासी फलाट क्रमांक सहा व सातवरील पायऱ्यांचा वापर करू शकतात आणि पूर्वेकडील आणि उन्नत डेकसाठी एस्केलेटर आणि पश्चिमेकडे जाण्यासाठी इतर पादचारी पूल वापरू शकतात, असे रेल्वे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्लॅटफॉर्म चार व पाचवर जाण्यासाठी पुढील २० दिवस प्रवाशांना पायपिट करावी लागणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत