पालघरमध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक एक एकर क्षेत्रफळावर युरिया फवारणीसाठी दोन मनु

पालघर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्री अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये ड्रोनच्या मदतीने अल्पावधीत युरियाची फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक गावोगावी दर्शवले जात आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी पालघर जिल्हा विकसित भारत संकल्प यात्रा १५ नोव्हेंबर पासून २६ जानेवारी २०२४ पर्यंत राबवली जात आहे. या ७१ दिवसांच्या यात्रेमध्ये चार विशेष वाहनांद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील गावागावांमध्ये पोहोचवली जात आहे.
याच योजनेअंतर्गत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीद्वारे कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करून खत फवारणी करण्याचे तंत्र नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहे. यासाठी जिल्ह्यात चार ड्रोन व त्यासाठी ड्रोन पायलटची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना व नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवून कृषी क्षेत्रातील प्रगती बाबतची माहिती दिली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत