भाकरी मागितली दगड दिला! काळाराम मंदिर सत्याग्रह- २ मार्च १९३०.

” नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. अस्पृश्यांची सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षात घेता, त्यांनी गेल्या तीन-चार वर्षात जे स्वावलंबन व जे संघटन प्रत्यक्ष व्यवहारात प्रकट करून दाखविले व ज्या सोशिक व धैर्यवृत्तीचा माझ्या या बंधू-भगिनींनी परिचय करून दिला ती ही सारी घटना खरोखरच अपूर्व अशी आहे. दुसऱ्या कोणाचे सहाय्य नाही; कोणाची सहानुभूति नाही; उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखूष व विरोधी बनलेले; अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी, अस्पृश्यांकरिता व अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहासारखी चळवळ सतत तीन-चार वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणे चालवावी ही एकट्या हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगातील सर्व पददलित जनतेने अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही.”!!!
????डॉ. बाबासाहेब आंबेडकर
( संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-२०, पान नं.१९०)
दि.३० एप्रिल १९३२ रोजी “जनता “वृत्तपत्रांमध्ये ‘काळाराम मंदिर सत्याग्रह’ विषयी प्रकाशित झालेला बाबासाहेबांचा लेख.
काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही क्रांतिकारक घटना होती. यातूनच जातिव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम झाले. काळाराम मंदिरात प्रवेश करणाऱ्या महामानव बाबासाहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र अभिवादन.
???? संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत