एक जातीय शासन ही लोकशाही असुच शकत नाही…!!
भास्कर भोजने.
भाजपमध्ये नारायण राणे,नितेश राणे,निलेश राणे सारखे ९६ कुळी मुख्यमंत्री आमदार खासदार राहिलेले, ऊदयन राजे सारखे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार खासदार राहिलेले,निलंगेकर सारखे माजी मुख्यमंत्री घराण्याचे वारसदार, अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री, विखे पाटील पिता पुत्र,रावसाहेब दानवे असे अनेक तगळे मराठा नेते आहेत....!!
कॉंग्रेस पक्षात पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, कोल्हापूर चे खासदार छत्रपती शाहू,बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम.विशाल पाटील माजी मुख्यमंत्री घराण्याचे वारसदार असे अनेक नामवंत मराठा नेते आहेत....!!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही गटात मराठा नेतृत्व आणि मराठ्यांचा पक्ष अशीच ओळख आहे…!!
शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्यांचा खासदार मुलगा,गुलाबराव पाटील आणि सहकारी असे अनेक जण गणमान्य मराठा नेते आहेत़…!!
शिवसेना ऊबाठा गटातही अनेक मातब्बर मराठा नेते आहेत….!!
एकंदरीत दोन्ही आघाड्यांमध्ये महायुती आणि मविआ आघाडी मध्ये मराठा नेतृत्वाची भरमार आहे…!!
हे कमी की, काय तर जरांगे पाटील, युवराज संभाजी राजे आणि प्रहार पक्षाचे बच्चू कडू हे तीन्ही मराठा नेते तिसरी आघाडी तयार करीत आहेत. म्हणजे तिन्ही आघाड्यांमध्ये नेतृत्व कुणाचे.?? तर उत्तर आहे मराठा जातीचे किंवा मराठा वर्गाचे…!!
हे सगळे मराठा नेते आणि मराठा नेतृत्वाची भरमार असलेले राजकीय पक्ष कुणाला तिकिटे देणार.? आणि कुणाला निवडून आणणार.? उत्तर अगदी सोप्प आहे….!!
यामध्ये कुणी सेक्युलर आहे, कुणी पुरोगामी आहे. कुणी हिंदुत्ववादी आहे. कुणी जानते आहे.तरीही सगळं आपल्याच पोळीवर तुप ओढण्यासाठी चाललेलं आहे हे कोणत्याच मिडिया मधील पत्रकाराला दिसतं नाही हे लोकशाहीचे दुर्दैव आहे…!!
घराणेशाही संपवून लोकशाहीचे सामाजिकीकरण करायचे असेल तर आंधळ्या मिडिया मधील एकतर्फी बातम्यांवर,खोट्या आणि दिशाभूल करणा-या वृत्तांकना वर विश्वास न ठेवता एका जातीचे वर्चस्व झुगारुन देऊन सर्वसमावेशक ओबीसी,दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, समुहाला प्रतिनिधित्व देणा-या राजकीय पक्षाला निवडणे अतिशय आवश्यक झाले आहे….!!
ओबीसी, एस. सी. एस. टी. समूहाचे अर्थात १३+७+५२=७२% समुहाचे आरक्षण सत्ताधारी वर्गाने म्हणजेच सवर्णांनी म्हणजेच महाराष्ट्रातील घराणेशाही ने संपविले आहे….!!
संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार काढून घ्यायला सुरुवात झाली आहे म्हणून ओबीसी, दलित,आदिवाशी बांधवांनो वेळीच जागे व्हा आणि आपले अधिकार शाबूत ठेवा…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत