महाराष्ट्रराजकीय

ललित पाटील बाबत संजय राऊत यांचा मोठा दावा; फडणवीस यांचे ‘ते’ आरोप फेटाळले

राज्यात दडपशाही सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी फडणवीस आणि त्यांचं सरकार कसर सोडत नाही. खोटं बोला पण रेटून बोला सुरू आहे. ललित पाटील म्हणे शिवसेनेचा महानगर प्रमुख होता. आम्ही यादीच दिली आहे. तो शाखाप्रमुख काय, गटप्रमुखही नव्हता. तुमचेच लोक त्याला पोसत होते. ज्यांनी ललित पाटीलला पोसलं आज तेच लोक तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. किती खोटं बोलत आहात. त्यांच्या खात्यावर कंट्रोल नाही. किंवा गुप्तचर विभाग त्यांना खोटी माहिती देत आहे. इतका अपयशी मंत्री राज्याने पाहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. दादा भुसे म्हणतात की, ललित पाटीलला उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं. त्याला घेऊन कोण आलं होतं? हा आपला खास माणूस आहे साहेब. याला शिवसेनेत घ्या. तो भाजपमध्ये जात होता. याला महाराष्ट्रात घेऊन फिरेल, असं दादा भुसे म्हणाले होते, असं सांगतानाच ललित पाटील कोण आहे हे आम्हाला माहीतही नव्हतं.

पण अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक यांच्यासह तुम्हाला माहीत असलेले आरोपी तुम्ही पक्षात घेतले. त्यांना मंत्रिमंडळात बसवलं. ज्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. अन् तुम्ही आम्हाला सांगताय. या सर्वांचं उत्तर तुम्हाला दसरा मेळाव्यात मिळेल, असंही राऊत म्हणाले.

घाम फुटल्यानेच पोपटपंची

आता जे पोपट बोलत आहेत. ते घाबरून बोलत आहेत. त्यांना घाम फुटला आहे. इकडे तिकडे ते आरोप करत सुटले आहेत. नाशिकसह राज्यातील गुन्हेगारांना कोण पोसतंय? ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचे खटले होते तेच तुमच्याकडे आहे ना. तुम्ही त्यांचे पोशिंदे आहात. तुम्हीच त्यांना पोसत आहात, असं सांगतानाच तुमचं इंटलिजन्स मजबूत करा. हमास सारखी परिस्थिती होईल. इस्रायललाही तेच वाटलं होतं. त्यामुळे तुमचे इंटेलिजन्स मजबूत करा, अशी टीका राऊत यांनी केली.

परिवर्तनाची नांदी दसरा मेळाव्यातून

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो. इतर कोणी कुठे भोंगे लावतात काही पडलं नाही. आमच्या दसऱ्या मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतील. देशप्रेमी येतील. दुसरं कोण काय करत असेल तर त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. ड्युप्लिकेट माल येतो दिवाळीत तसे ते आहेत. चीनी फटाके येतात, त्याचा आवाज किती असतो सर्वांना माहीत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!