देश-विदेश

भारत अमेरिका यातील संबंध मजबूत होणार – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन काल संध्याकाळी भारतात दाखल झाले. भारत अर्थात राजधानी दिल्लीत बायडन दाखल झाले, तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. हे स्वागत स्विकारल्यानंतर जो बायडन हे हॉटेलवर न जाता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्गवरील पंतप्रधानांच्या घरी पोहोचले. इथे पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळई बायडन आणि मोदी यांच्यात जवळपास दीडतास दीर्घ चर्चा झाली. या चर्चेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

त्यामध्ये रिन्यूएबल इंफ्रास्ट्रक्चर इंवेस्टमेंट फंड, बॅटरी स्टोरेज आणि ग्रीन टेक्नोलॉजी या करारामुळे आपल्यासाठी दररोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतींवर याचा परिणाम होणार आहे. सोलर पॅनेल, बॅटरी इंफ्रास्ट्रक्चर सारख्या वस्तूंच्या किमती कमी होतील. या शिवाय येत्या काळात इलेक्ट्रिक गाड्या आणि वीजेच्या दरातही घट होईल. न्यूक्लियर एनर्जीला या भेटीत प्रोत्साहन दिलं गेलं. यात नव्या टेक्नॉलॉजीला अधिक विकसित केलं पाहिजे, अशीही चर्चा झाली. रीन्यूएबल टेक्नोलॉजी आणि एनर्जी सिस्टमसाठी कौशल्या विकसित केली पाहिजेत, अशी चर्चा झाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!