मुंबईत स्वाईन फ्लू आजारानं ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पावसाळ्यातल्या आजारांबाबतच्या साप्ताहिक अहवालात मुंबईत स्वाईन फ्लू आजारानं ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असल्याचं आढळून आलं आहे. मागच्या तीन आठवड्यात शहरात स्वाईन फ्ल्यूच्या ५१ रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या १८ इतकी होती. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हा आजार बळावत असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन महानगरपालिकेनं नागरिकांना केलं आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, अशा सूचना दिल्या आहेत. महानगरपालिकेनं आतापर्यंत मुंबईतल्या ८ लाख ५५ हजार घरांचं सर्वेक्षण आणि ४२ लाख ७५ हजार नागरिकांची तपासणी केली आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत डेंग्यू आणि मलेरिया आजाराच्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाल्याचं दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत