शालेय अभ्यासक्रमात चांद्रयान -३ ची माहिती समाविष्ट होणार

चांद्रयान -३ ची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी एन सी इ आर टी नं विशेष दहा मोड्यूल तयार केले असल्याचा खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केला. विज्ञान आणि पौराणिक कथा यांचं मिश्रण केल्याबाबत माध्यमांमध्ये काही अहवाल प्रसिद्ध झाले होते, त्याबाबत एन सी इ आर टी नं हे स्पष्टीकरण दिलं आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांच्या पलीकडची माहिती देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. चांद्रयान मोहिमेच्या वैज्ञानिक, तांत्रिक, सामाजिक तसंच सांस्कृतिक पैलूंचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न यातून केला जाईल. चांद्रयान -३ मोहिमेची विविध छायाचित्रे, ग्राफिक्स, कार्यानुभव तसंच स्पष्टीकरणांच्या साहाय्यानं हे मॉड्युल्स अधिक विदयार्थी स्नेही बनवण्यात आले आहेत. पहिली पासून १२ वी पर्यंतच्या सर्व विदयार्थ्यांना या अभ्यासक्रमातील नव्या बदलाचा फायदा होईल, अशी माहिती एन सी आर टी नं दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत