सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जे सहकारी आहेत तेच आधी सरकारमध्ये होते. गैरसमज पसरवला म्हणूम त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती आहे की मुख्यमंत्री असणारा माणूस हा उपमुख्यमंत्री झाला आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. बिचारे देवेंद्र फडणवीस गोंधळात आहेत. त्यांचं खूपच डिमोशन झालं आहे. त्यामुळे मला देवेंद्रजी यांच्याबाबत खूप वाईट वाटतं. जो माणूस मुख्यमंत्री होता त्याला उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यांच्याबद्दल मला खूप आस्था, आदर आहे. त्यांच्यावर अन्याय झाला त्यामुळे ते गोंधळात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर वाचला. त्यामध्ये शरद पवार मंत्री होते का? शरद पवारांचा रोल काय होता? त्या जीआरमध्ये, २०११ मध्ये उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते का? इट्स अ जोक यार. जेव्हा आरोप करता तेव्हा गुणवत्ता असलेले करा. देवेंद्रजी तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. जे आज सत्तेमध्ये आहेत तेच २०११ ला सत्तेत होते. महाराष्ट्राची दिशाभूल कोणी केली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी आधी माफी मागायला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत