ओबीसी समाजाचे शक्ती प्रदर्शन

ओबीसी समाजाचे आरक्षण मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिने 2/9/2025चा जी आर काढण्यात आला हेदराबाद गॅझेट मधुन मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या लाभ मराठा समाजाला देण्यांत येत आहे. ह्या विरूद्ध ओबीसी समाजात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे.लाखो लोक रस्त्यावर उतरून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करुन शासनावर दबाव निर्माण केला.ही स्वागतार्ह असून अभिनंदनीय आहे.
ओबीसींच्या नावाने कार्य करणार्या संघटना व शासनात सहभाग असणारे ओबीसी नेत्यांनी आवाज उठवून ओबीसी समाजात जन जागृतीची मशाल पेटवून ओबीसी समाजाला लढण्यास तयार केले.एकजूट असल्याचे शासनाच्या लक्षात आणून दिले.
महात्मा ज्योतीराव फूले यांनी येथील वेदनांवर आधारित एक जातीच्या हिताकरिता वर्चस्व ठेवणार्या व्यवस्थे विरूद्ध संघर्ष करून शुद्र समाजात समतावादी व्यवस्था आणण्यासाठी जन चेतना निर्माण केली. र्स्ती पुरुषात शिक्षणाची गोडी निर्माण केली.महिला पुरुष शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर स्थानापन्न झाले. सत्य शोधक समाजाची स्थापना करुन चळवळ उभी केली.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात ब्राह्मणेतराना आरक्षण लागू केले. सत्यशोधक चळवळीला बळ दिले. अस्पृश्यता विरूद्ध कायदे के्ले
ज्या मूल्यांसाठी लढले.सामाजिक समता येऊन विषमतावादी व्यवस्था नष्ट व्हावी यांसाठी संघर्ष करून विषम व्यवस्थाचे रंग रूप स्पष्ट केले.
आज ओबीसीं आर्थिक प्रश्नांवर लढत असतानाच सामाजिक संमता च्या प्रश्नांवर संघर्ष करून सामाजिक शोषणाच्या विरूद्ध आंदोलन करने आवश्यक आहे.तरच महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराजांनी पाहिलेले स्वप्न साकार होऊ शकते हिंदूंच्या नावांनी भूलविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आळा घालते आवश्यक आहे. ह्या दृष्टिने विचार व्हावा.
विनायकराव जामगडे
9372456389
दिनांक 13/10/2025
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत