कायदे विषयकदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

निवडणूक ‘घोळांनी’ पोखरलेल्या ज्ञानेश कुमार यांच्या जागतिक नेतृत्वाची ढोंगबाजी!

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदावर ‘नैतिक महाभियोग’ आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह आणि नैतिक आव्हान आलेलं असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक साहाय्य संस्थाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणे, ही बातमी भारतीय लोकशाहीसाठी आनंदाची नसून, आत्मपरीक्षणाची आणि कठोर चिंतेची आहे. जागतिक स्तरावर लोकशाहीचे नेतृत्व करण्याच्या या महत्त्वाकांक्षी भूमिकेकडे पाहताना, प्रत्येक सजग नागरिकाच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो.ज्या संस्थेचे प्रमुख आपल्याच देशात ‘नैतिक महाभियोगा’च्या छायेत आहेत, ते जागतिक व्यासपीठावर लोकशाहीचे कोणते आदर्श मांडणार आहेत? देशात निवडणुका म्हणजे थट्टा ठरत असून सत्ताधारी ह्यांचे कलाने काम सुरू असल्याची अनेक निवडणुकीत सामोरे येत आहे.कुमार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे सर्वात मोठे कारण त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया आहे.त्यांचे नेमणुकीचा आधारच सदोष आहे.सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्त निवड समितीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता.परंतु, केंद्र सरकारने घाईगर्दीत कायदा बदलून सरन्यायाधीशांना वगळले आणि सत्ताधाऱ्यांचे बहुमत असलेल्या समितीद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली.ही नियुक्ती न्यायव्यवस्थेच्या आदेशाला डावलून आणि घटनात्मक स्वायत्ततेच्या तत्त्वांना दुर्लक्षित करून झाली आहे.ज्या आयोगाच्या प्रमुखाची निवड प्रक्रियाच लोकशाही मूल्यांना कमकुवत करणारी आहे, त्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय नेतृत्व देणे म्हणजे लोकशाही संस्थांना कमकुवत करण्याच्या प्रवृत्तीचे जागतिक स्तरावर लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेची निव्वळ थट्टा आहे.
कारण आहे ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात झालेले ‘घोळ’ आणि ‘पक्षपातीपणा.’
केंद्रित निवडणूक आयोगावर अनेक गंभीर अनियमितता आणि पक्षपातीपणाचे आरोप झेलले आहेत, ज्यामुळे आयोगाची विश्वासार्हता ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.सोबतच सत्ताधाऱ्यांपुढे ‘नतमस्तक’ होण्याची वृत्ती ही देखील देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे.सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आचारसंहिता उल्लंघनांवर आयोगाने वारंवार मौन बाळगले. याउलट, विरोधी पक्षांच्या तक्रारी तातडीने फेटाळण्यात आल्या.आयोगाचे हे वर्तन ‘निष्पक्ष’ संस्था म्हणून नव्हे, तर ‘सत्ताधारी पक्षाची भाजप आणि संघाची शाखा’ म्हणून काम करत असल्याचे दर्शवते.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पारदर्शकतेबद्दल आजही देशातील नागरिकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये संशयाचे वातावरण आहे.या गंभीर मुद्यावर मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यात आयोग पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
जो आयोग आपल्याच देशातील मतदारांचा विश्वास आणि संविधानाची स्वायत्तता जपण्यात कमी पडला, तो आता जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक साहाय्य संस्थाच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्याचे कोणते धडे देणार आहे? भारताचा अनुभव हा ‘उत्तम निवडणूक व्यवस्थापनाचा’ नाही, तर ‘सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार निवडणूक पार पाडण्याचा’ आहे, हे आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक साहाय्य संस्थाने ओळखायला हवे होते.
मुळात आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक साहाय्य संस्था ही संस्था जगभरात निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी काम करते. अशा संस्थेच्या अध्यक्षपदी भारतातील एका वादग्रस्त आणि ‘स्वायत्ततेचा अभाव’ असलेल्या आयोगाच्या प्रमुखाची निवड करणे, हा त्या संस्थेचा नैतिक पराभव आहे.ही निवड विकसनशील लोकशाही देशांना असा संदेश देते की, तुमच्या देशातील निवडणूक प्रक्रिया सदोष असली तरी, तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उच्च पदे मिळू शकतात. हे लोकशाही मूल्यांच्या जागतिक आदर्शांसाठी अत्यंत धोकादायक आहे.जागतिक लोकशाही साठी धोक्याची घंटा आहे.
त्यामुळेच ज्ञानेश कुमार यांचे अध्यक्षपद केवळ एक औपचारिक पद नसून, भारतीय लोकशाहीच्या ढासळत्या प्रतिमेचे ते जागतिक स्तरावरील प्रतीक बनले आहे. त्यांच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक साहाय्य संस्थाच्या उद्दिष्टांवर आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भारताने जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यापूर्वी, आपल्याच घरातील लोकशाहीचे ‘घोळ’ आणि ‘भ्रष्टाचार’ दूर करणे अधिक महत्त्वाचे आहे.अन्यथा, हे नेतृत्व म्हणजे देशाच्या अपयशावर पांघरुण घालण्याची एक लाजिरवाणी कृती असून भाजप आणि संघाला हवे असलेले बेकायदा कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावर मिळालेले पद दाखवून लोकशाहीत सर्व आलबेल असल्याचे आभासी चित्र उभे करण्यासाठी केलेला बनाव आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!