प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील राजकीय दृष्ट्या एकत्र येणार.
जालन्यातील अंतरवली सराटीमधून सुरु झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन सध्या राज्यभर चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेला मराठा आरक्षणाबाबतचा लढा. नुकतीच जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे राजकीय दृष्ट्या एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत याला निमित्त ठरलय सुजाता आंबेडकर यांनी केलेलं सूचक विधान.
मराठा समाजात आरक्षणावरून गरीब श्रीमंत असे वर्गवारी दिसू लागली आहे. आमचा गरीब मराठा लोकांच्या आंदोलनाला पाठींबा असल्याचे मत सुजाता आंबेडकर यांनी व्यक्त केले. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मात्र मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. असही सुजाता यावेळी म्हणाले. मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर राजकियदृष्ट्या एकत्र येणार का ? मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात राजकीय चर्चा झाली का ? असे सवाल सुजात आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले, “एकत्र येणार का ? याबाबत सरप्राईज मिळणार आहे. दोघांमध्ये काय राजकीय चर्चा झाली ते दोघेच सांगू शकतात. मात्र येणाऱ्या काळात सरप्राईज मिळू शकते” असं सूचक वक्तव्य सुजात यांनी यावेळी केले.
“आम्ही सगळ्याच समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला संधी मिळेल. मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या राजकीय चर्चा याबाबत वेट अँड वाच केलं पाहिजे असं देखील सुजात आंबेडकर म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत