निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भारताची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हो ! – हंसराज कांबळे

ब्राह्मण संघ लोकांनी सत्ता जी हस्तगत केली आहे ती *हिंदू लोकांना देव – धर्मात डूबवून भावनिकतेचा मारा करून बोलूनच केलेली आहे* हे सत्य नाकारता येत नाही.आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी लोकशाही बाबत हिंदू धर्माचे मत व्यक्त करताना सत्य लिखित स्वरूपात लिहून ठेवलेलेच होते आणी आहे ते म्हणजे –
*हिंदी लोक परंपरेने बुद्धिवादी नसून अतिरिक्त श्रद्धाळू वृत्तीचे आहेत. जो सर्वसामान्य माणसाहुन विक्षीप्तपणे वागतो आणि तो त्या विक्षीप्त वाघ वागण्यामुळे इतर देशात पागल ठरेल तो या देशात महात्मा किंवा योगी ठरतो. आणि धनगराच्या पाठीमागून जशी मेंढरे जातात तसे लोक त्यांच्या पाठीमागून जाऊ लागतात*

संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं.331. पैरा – 2.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मण आणि संघ लोकांना सत्ता मिळाल्यास ती टिकून ठेवण्यासाठी कसोशीने उठाठेव करून कसे प्रयत्न करतात याविषयी लिहिताना ते म्हणतात –
*ब्राह्मणांनी मिळवलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करणारे ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात मी निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य कराव्यास सुरुवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय राहणार नाही*

संदर्भ – खंड.18. भाग – 2. पृष्ठ. क्रं.342. पैरा – पहिला. शेवटची ओळ.
उपरोक्त संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मण लोक सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी जसे कसोशीचे प्रयत्न करतात तसेच आपल्या कार्यकर्त्या मंडळी सुद्धा कार्य करायला हवे हा दूरदृष्टीपणा ठेवूनच त्यांनी आपणा सर्वांना संदेश दिला होता. पण आपल्या समाजातील कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पालन न करता ब्राह्मण संघात अमिषापोटी घुसखोरी केली हेच ते आपल्या समाजातील भाडोत्री कार्यकर्ते आहेत.
आताच्या 24 च्या निवडणूकित जर पुन्हा बीजेपी आली तर त्यांना विधान बदलण्याची संधी मिळाली तर ! आद. बाळासाहेब आंबेडकर सोडणार नाही…. असे आपण म्हणता ते सत्य आहे पण याही पुढे मी असे जाऊन म्हणीन की , निव्वळ बाळासाहेब आंबेडकरच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ व स्वाभिमानी असलेला बौद्ध समाज ( भाडोत्री कार्यकर्ते सोडून ) त्यांच्या विचारांची भारतातून पायमल्ली करीत असेल तर ते कधीही खपवून घेणार नाही
भारताचे सरन्यायाधीश आद. चंद्रचूड सर हे उच्च पदावर असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे म्हणून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर ठाम असून त्यांच्या विचारसरणीनुसार भारताची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ह्यासाठी ते कटाक्ष नजर ठेवून पदभार सांभाळीत आहेत. भारताची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असे जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दूरदृष्टीपणा होता आणि ते म्हणतात –
जगाच्या पाठीवरून माणसा माणसातील संबंधाचे योग्य पालन करविणारे लोकशाहीचे तत्व लुप्त होऊ नये म्हणून लक्ष देणे आपले जबरदस्त कर्तव्य ठरते असे मला वाटते. आपला जर त्यावर विश्वास असेल तर आपण त्याशी एकनिष्ठेने व सत्याने वागले पाहिजे. आपला लोकशाहीवर खंबीर विश्वास असूनच भागणार नाही तर ” समता स्वातंत्र्य आणी बंधुभाव ” या तत्त्वांचा मुळासह नाश करणाऱ्या लोकशाहीच्या शत्रूला कोणत्याही कृत्याने आपण मदत करणार नाही असा आपण दृढनिश्चय केला पाहिजे. या प्रश्नावर सर्वांचे एकमत आहे अशी मी आशा करतो वझर तुमचे माझ्याशी सहमत असेल तर हे ओघानेच येते की, लोकशाही संस्कृतीच्या पायाचे रक्षण करण्यासाठी इतर लोकशाही देशासोबत आपण जोराचा प्रयत्न केला पाहिजे. ” जर लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे नक्कीच आपणास लाभतील जर लोकशाही मेली तर तो आपला विनाश आहे यासंबंधी शंका नको
संदर्भ – खंड.18 भाग – 2. पृष्ठ क्रं.417 – 418. पैरा – शेवटचा. प्रकरण – 194.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपरोक्त विधानानुसार भारताचे सरन्यायाधीश आद. चंद्रचूड सर , आद. बाळासाहेब आंबेडकर आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ आणि स्वाभिमानी कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसार आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या नुसार – जर लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे नक्कीच आपणास लाभतील जर लोकशाही मेली तर तो आपला विनाश आहे हे शतप्रतिशत सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे !

दि.7 मार्च 24.

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!