देशप.महाराष्ट्रभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतरे आणि त्याचे पडसाद व प्रस्थापित पक्षांचे वर्तन ,,,,,!


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज
तालुका माळशिरस ,, जिल्हा सोलापूर मो न 9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या .
आणि सोलापूर जिल्ह्यातून थेट पक्षांतराची लाट अचानक
उसळल्याची जनतेच्या दृष्टी क्षेपात आली ,,
सोलापूर मधून माजी आमदार दिलीप माने , मोहोळ मधून माजी आमदार राजन पाटील अनगर कर , आणि माढा मधून माजी आमदार बबन दादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे , सांगोला मधून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील ,, अश्या सर्व पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मधील नेते मंडळी यांची रांग तिकडे लागली .
माळशिरस तालुक्यात ही मोहिते पाटील यांच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीत थेट भाजपला आव्हान देणारे , विधानसभा निवडणुकीत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात घट्ट पकडुन ठेवणाऱ्या मोहिते पाटील यांनी विधान परिषद आ रणजित सिंह मोहिते पाटील यांना त्या निवडणुकीपासून तटस्थ ठेऊन भाजपा समवेत ही आपण आहोत व आमची राजकीय शक्ती डावलून तुम्ही घेतलेले उमेदवार निवडीचे निर्णय याचे शी आम्ही सहमत नाही .
आम्हाला आमचे अस्तित्व दर्शवून ठेवणे अनिवार्य झाल्याने हे बंड त्यांनी केले आणि त्यात ते यशस्वी ही झाले ,,
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अशी राजकीय स्थिती निर्माण झाली होती , महाराष्ट्रातील भाजपा सरकार चे विरोधात जनमत घडले होते ,, राष्ट्रवादी काँग्रेस ची फूट आणि शिवसेनेची फूट या मुळे एक भावनिक सहानुभूतीची लाट संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत होती ,,
5मे 2024रोजी यावर मी एक लेख लिहिला होता “भाजपा महाराष्ट्रात पराभूत होत आहे “त्याची कारणं मीमांसा ” तो फिरत फिरत अकोला येथे पोहचला आणि देशोन्नती अकोला एडिशन ने 12 मे 2024रोजी तो छापला , त्यात मी भाजपा लोकसभेला महाराष्ट्रात दोन अंकी संख्या ही गाठू शकणार नाही असे भाकीत केले होते , आणि तसेच घडले .
या दरम्यान निर्माण झालेली लाट इतकी प्रबळ होती की विधानसभेत ही अशीच स्थिती राहील असा राजकीय अंदाज बांधून सगळे हे मातब्बर घराणी आहे तिथेच थांबून प्रतीक्षा करत होते ,
हेच काम मोहिते पाटील घराण्याने ही केले त्याची परिणीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तमराव जानकर यांना दिलेली उमेदवारी विजय प्राप्त करू शकली व ते आमदार झाले .
अप्रत्यक्ष रीत्या भाजपच्या मेळ्यात म्हणून अजित दादा यांच्या कडे असलेले राजन पाटील अनगार कर यांनी माजी आमदार यशवंत माने यांना तिकीट दिले आणि राजन पाटील यांच्या तुलनेत छोटे असलेले नरखेड चे उमेश पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार यांचे प्रवक्ते होते त्यांच्या वर जाहीर भाषणात टीका करताना ना अजित दादा यांनी गाडी खालच्या कुत्र्याची उपमा त्यांना बहाल केली .
या मागे त्यांची भावना पाहिली तर राजकारणात पक्षाने दिलेल्या मोठ्या पदा पेक्षाही वास्तव शक्ती किंवा व्यापक जनाधार असलेल्या घराणी मोठी असतात , व संसदीय राजकारणात पक्ष सत्तेत आणायचा असेल तर अश्या नेतृत्वाना अधिकचा वाव द्यावा लागतो , तो देत असताना
पक्षातील निष्ठावंत , व तळातील कार्यकर्त्यांच्या भावनेला अपरिहार्यतेने दाबावे लागते .
मी इथे माझ्या 40 वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनात प्रत्यक्ष पाहिलेली , उदाहरणे वानगी दाखल देत आहे ,,
मी साधारण 10/11वित असताना शरदचंद्र जी पवार साहेब यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून एस काँग्रेस स्थापन केली होती ,,
माळशिरस तालुक्यात काँग्रेस पक्षाचे दावेदार माजी उपमुख्य मंत्री विजयसिंह जी मोहिते पाटील होते ,, परंतु त्यांना तिकीट न देता , जनता पक्षातून काँग्रेस कडे आलेल्या स्मृती शेष माजी आमदार शामराव पाटील पानिवकर यांना काँग्रेस ने उमेदवारी दिली , व पक्षाचे चिन्ह ही दिले .
विजय सिंह जी मोहिते पाटील यांना अपक्ष म्हणून ही उमेदवारी लढावी लागली व ते विक्रमी मतांनी विजयी ही झाले ,,
एस काँग्रेस कडून स्मृती शेष सुभाष ताटे हे उभे होते ,, ज्यात त्यांचा पराभव झाला ,,
माजी पंतप्रधान राजीव जी गांधी यांचे तत्कालीन काळातील पवार साहेब यांचे सहकारी सुरेश जी कलमाडी यांनी विमान तळावर गुलाब पुष्प देऊन सत्कार केल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून झळकल्या , व एस काँग्रेस काँग्रेस आय मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला गेला ,,
तेंव्हा पवार साहेबांनी सुभाष जी ताटे यांना या बाबत कल्पना दिली , आत्ता मोहिते पाटील यांचे विरोधात तुम्हाला राजकारण करता येणार नाही , तुम्ही व्यवसाय करावा , अर्थात त्या साठी जे जे आवश्यक आहे ते ते साहेबांनी त्यांना दिले .
राजकीय क्षेत्रात इतका वैचारिक प्रावह स्पष्ट नव्हता , व स्मृती शेष गोपीनाथ जी मुंडे साहेब यांनी माधव फॉर्म्युला भाजप साठी निर्माण केलेला होता
मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रबळ राजकीय पक्ष भाजपा होता आणि त्याचे नेतृत्व ऍड सुभाष (अण्णा ) पाटील यांच्या कडे होते ,,
धनगर समाजातील एक प्रभुत्वशाली नेतृत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात होते ,, व जो प्रदीर्घ राजकीय संघर्ष त्यांनी केला त्यात त्यांनी स्वतःच्या जमिनी विकून त्या आधारे राजकारण केले
या मधील फरक हा 15/16हजाराच्या दरम्यान रहात असे ,,
स्मृती शेष प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे समांतर स्वतंत्र राजकारण चालू झाले होते , व गोपीनाथ जी मुंडे यांचे व त्यांचे सबंध अधिक घनिष्ट होते ,,
त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि त्यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपने सहकार राज्य मंत्रिपद त्यांच्या कडे सोपवले ,,
ऍड सुभाष अण्णा पाटील यांचा प्रदीर्घ संघर्ष पक्षाने नजर अंदाज केला
माझ्या कडे तेंव्हा सोलापूर जिल्हा मागासवर्गीय युवक चे अध्यक्ष पद होते ,,
नव्या जुण्यांचा संघर्ष तेंव्हा ही अस्तित्वात होता ,, सोलापूर मधील भाजप चे एक पदाधिकारी मोहन डांगरे हे होते , त्यांची माझी ओळख होती ,, ते जिल्हाधिकारी कार्यालयात मला भेटीत म्हणाले अविनाश संसदीय राजकारणात मोठ्या नेत्यांशी जुळवून घ्यावे लागते ,, तुम्ही अकलूज चे आहात ,, तुम्हांला जुळवून घेण्यात काय अडचण आहे?
संसदीय राजकारण हे फक्त वैचारिक असते का? या बाबत खरोखर शंका च आहेत ,
सोलापूर जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षा ची धोरणे , विचारसरणी ही कष्टकरी शेतकरी वर्गाशी जोडलेली असताना ही या पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते सहकारी बँकेपासून ते प्रत्यक्ष मतदार संघात ही काँग्रेस नेत्यांशी जुळवून घेण्याचे राजकारण करत ,,,
सोलापूर मध्ये माजी आमदार दिलीप माने यांना कडवा विरोध भाजपची जुनी फळी करते आहे , असाच विरोध भाजपचे पदाधिकारी म्हणून माळशिरस तालुक्यात माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा आहे
मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडून निवडून आणलेले लोकसभा व विधानसभेच्या जागा , त्यातून रामभाऊ सातपुते यांचा झालेला पराभव व त्याची भळभळती जखम घेऊन इर्षेला पेटलेल्या रामभाऊ सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या बाले किल्ल्यातील भावकी सोबत घेऊन आणि वेचक विरोधकांना सोबत घेऊन पक्षाच्या मदतीने त्यांना बळ प्रदान करून टक्कर देण्याची रणनीती आखलेली असताना , मोहिते पाटील यांनी ही भाजपा मधील अंतर्गत संघर्षातून निर्माण झालेल्या फळी ला शक्ती देण्याचे काम सुरू ठेवले
प्रत्यक्ष पडद्यावर मोहिते पाटील शांत दिसत होते परंतु पडद्या मागून अनेक सूत्रे हलवली जात होती हे ही तितकेच खरे आहे .
भाजपा मधील दुसरी मूळ फळी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या बाजूने फारशी समाधानी राहिलेली नव्हती ,, त्यांचे दृष्टीने भाजपा सशक्त व्हायची असेल तर राजकारणात शुद्धता राहिली पाहिजे ,
ज्यांच्या मागे जनाधार आहे असे नेते डावलून जनाधार नसलेल्या लोकांना फक्त पक्षाची पदे देऊन , त्यांच्या सोबत गुंडांना राजकीय बळ देऊन उलट पक्षी भाजपचा जो जनाधार आहे तोच कमी होत जाईल व पक्षाचा फायदा होण्या ऐवजी त्या मुळे नुकसान च अधिक होईल .
म्हणून हा राजकीय गट आ रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात फारसा सक्रिय झाला नाही , आणि होणार ही नाही .
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्ही आ रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या सोबत आहोत अशी भूमिका जयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली ,,
ते शंकर नगर येथील सहकार महर्षी शंकर राव नारायणराव मोहिते पाटील सह सा कारखाना चेअरमन आहेत , आणि त्यांच्या कडे शिक्षण प्रसारक मंडळ , सुमित्रा पतसंस्था , सह इंजिनियर , आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज चे विस्तृत जाळे आहे
मोहिते पाटील घराण्याचा राजकीय बॅक बोन म्हणून त्यांची ओळख असली तरी ते थेट कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत
म्हणून त्यांना त्याच्या घराण्याच्या हिताची , व सोईची भूमिका क्षणाचा ही विलंब न लावता घेता येते ,,
तो मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांचा दिशा दर्शक आहे ,
या इंडिकेटर चे सूचने नुसार समर्थक कार्यकर्ते काम करतात हे वास्तव आहे
सोलापूर लोकसभा पोट निवडणुकीत त्यांनी स्मृती शेष प्रताप सिंह मोहिते पाटील यांच्या बाजूने जायचे आहे असे सांगितले आणि तेंव्हा त्यांचे ज्येष्ठ बंधू राष्ट्रवादी काँग्रेस मधून थेट उप मुख्य मंत्री होते ,
आणि भाजपा उमेदवार म्हणून प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब होते , तरी पक्षीय विचार न करता कार्यकर्त्यांनी स्मृती शेष प्रतापसिंह जी मोहिते पाटील यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले , आणि तो विजय खेचून आणत तत्कालीन काँग्रेस चे नेते आनंद राव देवकाते यांचा पराभव घडवून आणला ,,
याच निवडणुकीत प्रा लक्ष्मण राव ढोबळे यांनी आघाडी धर्माचे पालन करून काँग्रेस चां प्रचार केला त्याची परिणीती उस्मानाबाद राखीव मधून ते उभे असताना त्यांना पराभवास सामोरे जावे लागले ,,
याच मोहिते पाटील यांच्या दुहेरी निष्ठे विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस चे औरंगाबाद येथील चिंतन मेळाव्यात , सूर्यकांता पाटील ते प्रा ढोबळे यांनी टीकेचा सुर आळवला होता ,
असाच सूर आत्ता माजी आमदार रामभाऊ सातपुते आणि त्यांचे सभोवती जमलेले मोहिते पाटील यांच्या मूळ घराण्यातील म्हणजे माने पाटील यांच्यातील कांहीं स्थानिक नेते , आणि कांहीं जनाधार नसलेली राजकीय अनुभव हिन सोशल मीडिया वरील नेते अल्पवयीन मुले थोडीशी खळ खळ करत आहेत
ते या प्रकाराने धस्तीत गेले आहेत ,,
” ए दिवार टूटती क्यू नहीं” अशी जाहिरात अंबुजा सिमेंट ची आहे , तशी त्यांची गत झाली आहे ,,
लोखंडी सळ्या घालून ओतीव सिमेंट खडी वाळू मिश्रित पिलर फोडण्यासाठी हत्ती , ट्रॅक्टर ची धडक उपयोगाची नसते ,,
त्या साठी जिलेटीन आणि बारुद यांचा स्फोट घडवावा लागतो.
ती क्षमता केंद्रीय भाजपा कडे होती व आहे , देवेंद्र जी फडणवीस यांच्या कडे ही आहे ,,
या शक्तीला आव्हानित करण्याचे काम .ओहिते पाटील यांनी केलेच नव्हते ,, हे ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ,,
पण पोपट ओरडत राहिला ,, कांहीं जणांनी पोपटाला देवेंद्र जी फडणवीस याचे प्रॉक्सी मानले त्यांची फसगत आणि कोंडी झाली आहे ,,
मी एक गमतीशीर कथा वाचली होती त्या कथेचा सारांश इथे सांगतो ,
एकदा एका घरातील
एअर कंडीशनर बिघडतो ,, त्या घराची मालकीण एका मेकेनिकल ला बोलावते , तो येतो ही , पण अचानक तिचे काम निघाले म्हणून तिला जाणे अत्यावश्यक असते , बंगल्याच्या गेट वर त्यांची भेट होते , ती या मेकॅनिकल कडे घराची चावी देते ,, आणि सांगते की तुम्ही तुमचे काम करा पण त्या खोलीत एक सिंह झोपलेला आहे , तो तुम्हाला कांहीच करणार नाही ,, तुमचे काम तुम्ही करा ,, घाबरु नका ,, त्याच खोलीत एक पोपट आहे , त्याला मात्र बोलू नका ,, तो तुम्हाला डीवचेल , शिव्या देईल त्याचे कडे लक्ष देऊ नका ,,
त्याला डिवचू ही नका ,
तो मेकॅनिकल काम करत राहिला , पोपट शिव्या देत राहिला , चोर , लूच्चा , भ्रष्टाचारी असे बरेच कांहीं ,,
काम संपले आणि जाताना त्याने त्या पोपटाला डीवचले मूर्ख कुठला ?
त्या बरोबर तो पोपट ओरडला धर याला , आणि टाकं मारून ,, तसा सिंह झेपावला आणि त्या मेकॅनिकल चां दुर्दैवी अंत झाला ,,,
राजकीय सत्ता बळकट करण्यासाठी अश्या शक्ती पक्षाला हव्या असतात , पक्षाचे कार्यकर्ते हे मॅकेनिकल असतात , त्यांनी त्यांचे काम पक्ष सांगेल तेवढेच करावे ,,
पोपट शक्ती नसतो , झोपलेला सिंह खरी शक्ती असते ,, पक्षाने कोणते निर्णय घ्यावे काय चूक काय बरोबर हे पोपट ठरवत नाही ,,
ठरवू ही शकत नाही ,,
या पोपटाचे नादाला लागून झोपलेला सिंह मात्र त्यांनी जागा केला , अर्थात याची किंमत त्यांना चुकवावी लागेल ,,
मोहिते पाटील हे ऑक्टोपस आहेत , ते सगळ्या पक्षात जाऊ शकतात ,, तुम्ही कुठे जाणार आहात?
विधानसभा निवडणुका अजून दूर आहेत ,,
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची ? हे आमदार उत्तम राव जानकर यांना ठरवावे लागेल ,, स्वतःचा राजकीय कॅनव्हास आणि लोकशक्ती शाबूत ठेवण्यासाठी त्यांना हे करावेच लागेल ,, एवढाच पेच त्यांच्या समोर आहे ,, ते तो कसा सोडवतील ? यात त्यांचे बुध्दी चातुर्य आहे ,,
इतकेच ,,,,,,!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!