माजीद कुरेशी यांची समाजवादी पार्टीच्या नळदुर्ग शहराध्यक्ष पदी

एकमताने निवड .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते राष्ट्रीय हायवेवर बालाघाट डोंगराच्या कुशीत वसलेल्या या शहराची लोकसंख्या ३० ते ३५ हजार एवढी आहे माजीद अरीफ कुरेशी हे नळदुर्ग शहरात सामाजिक राजकीय सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात त्यामुळे त्यांची समाजवादी पार्टीच्या नळदुर्ग शहराध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु अझमी यांच्या सहीने देण्यात आले आहे .
माजीद कुरेशी यांची शहराध्यक्ष पदी होताच समाजवादी पार्टीचे नेते देवानंद भाऊ रोचकरी , समाजवादी पार्टीचे यूवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा भाऊ रोचकरी , जिल्हाध्यक्ष लिंगय्या स्वामी , अभियंता शोएब काझी , यूवा नळदुर्ग शहराध्यक्ष सईद बागवान , अकबर कुरेशी , अपताफ कुरेशी , कैफ मुन्वर पटेल , सह अनेक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत माजीद कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत