खासगी शाळेतील पीएच.डी. शिक्षकांवर अन्याय – क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

“समान पात्रता, समान कार्य… तरीही भेदभाव का?” – शासनाने तातडीने दुरुस्ती करावी..कादरी शाहेद
बीड, दि. 23 सप्टेंबर (प्रतिनिधी):
क्रांतिकारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील पीएच.डी. धारक शिक्षकांना शासनाच्या निर्णयामध्ये वगळण्यात आल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, त्वरित दुरुस्ती करून समान लाभ द्यावेत अशी मागणी करण्यात आली.
ग्रामविकास विभागाने 07/08/2025 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये फक्त जिल्हा परिषद शाळांतील पीएच.डी. शिक्षकांचा विचार करण्यात आला आहे. मात्र खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना लाभातून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात अन्याय व असंतोष निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संघटनेच्या प्रतिनिधींनी ठामपणे सांगितले की, “पीएच.डी. ही पात्रता सर्व शिक्षकांसाठी समान आहे. मग शासनाने केवळ काहींचाच विचार करून इतरांना दुर्लक्षित करणे हा सरळ भेदभाव आहे. शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग यांनी एकत्रित बैठक घेऊन हा अन्याय दूर करावा.”
या प्रसंगी संघटनेचे संस्थापक सचिव कादरी शाहीद अब्दुल गफूर, जिल्हाध्यक्ष मोहम्मद असरार, जिल्हा सचिव प्रा. डॉ. गायकवाड शशिकांत यांच्यासह पवार सर, युनूस सर, फतेहुल मुबीन सर, अज़ीज सर, ताजोद्दिन सर, राजू सर, डॉ. मुफ्ती तवक्कल सर, डॉ. शेख सगीर सर, अली सर आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत