दिन विशेषदेशभारतमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

अज्ञानामुळेच मानवी जीवनात दुःखाचा प्रवेश होतो..

भंते डॉ.यश कश्यपायन महास्थवीर

लातूर,दि.०१(मिलिंद
कांबळे)

अज्ञान हेच मानवाच्या दुःखाचे मूळ कारण आहे.आणि अज्ञानामुळेच मानवाच्या जीवनात दुःखाचा प्रवेश होतो.
त्यासाठी जीवनातील दुःख समजून घेऊन आपल्याला त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. अज्ञान म्हणजे केवळ माहितीचा अभाव नाही, तर आपल्या जीवनातील गोष्टी आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करणे होय.असे प्रतिपादन भंते डॉ. यश कश्यपायन महास्थवीर यांनी केले.
ते वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे
बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वाच्या निमित्ताने आयोजित धम्मदेशनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
तत्पूर्वी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाना उपासक-उपासिकांच्या वतीने पुष्प पुष्पमाला अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद खटके, सुनील कांबळे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भंते पुढे म्हणाले कि,
माणसाच्या जीवनात दुःख आहे दुःखाला कारण आहे. त्यावर उपाय आहे दुःखाचा उदयव्यय ही प्रक्रिया अखंड चालू आहे. अज्ञानामुळे दुःख उत्पन्न होते म्हणून या दुःखाला दूर करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. त्याचे आचरण करून दुःखाला दूर करा आज आणि उद्या भगवान बुद्धाचा विचार जगाला आवश्यक आहे त्यामुळेच बुद्धाला डॉक्टरांचे – डॉक्टर म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले कि, अज्ञानामुळे मानवी जीवनात दुःख आहे त्याला कारण आहे घराघरात आई -मुलगा मुलगा -वडील गावा – गावात राज्या- राज्यात देशा -देशात कलह आहे. हा कलह आजचा नाही तर भूतकाळात होता आजही आहे.उद्याही राहणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे कि, विश्वात जो पर्यन्त सूर्य, चंद्र आहे. तोपर्यंत मानवी जग जिवंत राहायचे असेल तर बुद्धाच्या विचाराची कास धरावी लागेल अन्यथा हा कलह या मानवी जीवनाचे काय करेल ते सांगता येत नाही. याकरिता वैराची आवश्यकता नसून मंगल मैत्रीची गरज असल्याचेही आपल्या धम्मदेशनेत भंते कश्यपायन यांनी नमूद केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद खटके, सुनील कांबळे यांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सुप्रिया सातपुते समाजशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यांचा बुद्ध पुस्तिका स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भरत कांबळे, सूर्यभान लातूरकर, किशोर कांबळे, कुमार सोनकांबळे, साहित्यिक जी जी कांबळे, आबा गायकवाड, दामू कोरडे, अशोकराव सातपुते, वसंत वाघमारे, उत्तम गायकवाड, राजू कांबळे, असित कांबळे ,शकुंतला नेत्रगावकर ,शीलाताई वाघमारे ,मीना सुरवसे ,अनुराधा कांबळे ,लता गायकवाड ,लता कांबळे ,आशा बानाटे, आशा गायकवाड ,सविता चिकाटे, शारदा वाघमारे, छाया कांबळे इत्यादी उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले तर टि. एस कवठेकर यांनी भोजनदान दिले.शेवटी धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!