आरक्षण लढाई वरील उत्तर आरक्षणाचे सम न्यायिक वाटप हेच आहे ,,,,,,!

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले, अकलूज , तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर
मो न :-9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्राच्या राजकारणात गदर उठवून दिलेल्या शिवश्री मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण द्यावेत , व सर्व मराठा हे हैद्राबाद , बॉम्बे , सातारा गॅझेट नुसार ( शेती कसणारे कुणबी म्हणूनच आहेत ) अगदी महात्मा फुले यांच्या अनेक लेखनात मराठ्यांचा उल्लेख हा कुणबी म्हणून सापडतो , तसाच शिव काळात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगात ही ते स्वतः ला कुणबी म्हणूनच घोषित करतात•
मी दैनिक महापर्व चां संपादक असताना मराठा आरक्षण का आवश्यक आहे याचे दीर्घ असे 14 संपादकीय लिहिले होते ,
भारतीय राज्य घटनेत आरक्षण विषयावर झालेल्या चर्चा असतील किंवा इंद्रा सहानी केस असेल त्या नुसार आरक्षण हा मौलिक किंवा मूलभूत अधिकार नाही तर ती एक सवलत आहे ,,
ही सवलत सामाजिक मागासलेपणा मुळे आर्थिक , राजकीय , शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या (थ्री इम्पिरिकल डाटा) आधारे शैक्षणिक व प्रशासन सेवेतील भागीदारी देण्या साठी दिला जातो ,,
भारतीय राज्य घटनेने मार्गदर्शीत इतर मागास वर्गीय सूनीच्छित करण्यासाठी सर्व्हे करावा अशी शिफारस केली होती , त्या नुसार शासनाने खा काकासाहेब कालेलकर आयोगाची नेमणूक केली , व त्यात एस सी , एस टी , शिवाय अस्तित्वात असलेल्या गाव गाड्यातील बलुते दार ( कृषी अर्थव्यवस्थेच्या आसा भौवती फिरणाऱ्या समाजाचा )ओबीसी प्रवर्ग म्हणून समावेश केला ,,
अर्थात तेंव्हा त्यांनी आपला अहवाल सादर करताना , भारतातील बेरोजगारी वर कडवे भास्य केले होते
(Un employment is a biggest challeng on the day , we are sitting on now volcano)
बेरोजगारी हे असे सर्वात मोठे संकट आहे आणि आपण सर्व जण ज्वाला मुखी चे तोंडावर बसलेले आहोत
म्हणून माझ्या शिफारशी अमलात आणू नयेत ,अशी टिपण्णी टाकून त्यांनी तो अहवाल सादर केला .
पण पुढे हा दबाव वाढत गेला आणि त्यातून मंडल आयोग अस्तित्वात आला ,, त्याची अंमलबजावणी व्हीपी सिंग या सरकारने करण्याचे घोषित केले ,, आणि त्याला विरोध म्हणून मंडल विरूध्द कमंडल यात्रेला सुरुवात करून समग्र जनतेला “
“मंदिर वही बनायेंगे” या अजेंड्या कडे वळवण्यात आले ,,
बाबरी पतन ची क्रिया , आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून झालेले दहशत वादी हल्ले , सामाजिक ताण तणाव या बऱ्याच बाबी जनता जाणते ,,
यावर अधिक चर्चा करणे म्हणजे पोस्ट लांबवत नेणें ,,
“मराठा समाजाला आरक्षण देण्यात कायदेशीर , घटनात्मक कोणते अडथळे आहेत यावर अनेक चर्चा चे किस पडलेले आहेत ,,
स्वातंत्र्य मिळण्याच्या कालखंडात मुळात ही 50% ची अट गुणवत्ता व खुल्या मुक्त स्पर्धे साठी ठेवण्यात आली , आणि त्याला अंतिम कुंपण घालण्याचे काम न्यायालयाने केले इतकाच त्याचा अर्थ आहे ,
आरक्षण हे क्लास ला वर्गाला दिले जाते , जाती ला नाही ( कास्ट) हा ही युक्तीवाद आपण ऐकतो ,,
आणि मी इथे थोडक्यात हेच मांडू इच्छितो की , 50%चे आत समग्र शोषित समाज व्यवस्थेला सामावून घेऊन कथित गुणवत्ता धारक यांच्या साठी 50%मुक्त ठेवणे हीच पद्धत मुळात चूक आहे ,
मराठा , जाट , पटेल , अश्या कृषी प्रधान कृषक जात समूहाचा एक स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करा ,,
मराठा समाजातील राज्यकर्ते , कारखानदार यांचा बाऊ करण्याचे कोणतेही कारण नाही ,,
आज ही ओबीसी समूहाच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावतो च ना?
कृषक प्रवर्ग तयार झाल्या नंतर त्यांना राजकीय आरक्षण भले ही देऊ नका , पण शैक्षणिक आणि प्रशासन सेवेतील आरक्षण प्राप्त झाल्याने त्यांना ही न्याय मिळेल.
स्मृती शेष माजी न्यायमूर्ती पी बी सांवत (सुप्रीम कोर्ट) यांनी सांगितल्या प्रमाणे आरक्षणाचे फेर वाटप समग्र समाजात प्रवर्ग निहाय करा ,,
विद्यमान सगळे आरक्षण कायद्याच्या मर्यादा , त्या वरील निकाल , आणि चर्चेचे किस कपाटात बंद करून टाका ,
सगळ्या प्रवर्गाला त्यांच्या टक्के वारी नुसार वाटप करून टाका ,
ज्या कांहीं गुणवत्तेच्या स्पर्धा होतील त्या त्या प्रवर्गात होतील , कमी गुणवत्तेच्या माणसांना डॉकटर इंजिनियर करा , आय ए एस करा , जिल्हाधिकारी बनवा असे कोणी म्हणत नाही , गुणवत्तेचे कार्ड पुढे करून सगळ्या जागा कोणतीही रीतसर परीक्षा न घेता थेट भरती करून केंद्रीय सचिव बनवणाऱ्या एका जात समूहाचे कारस्थान सांघिक रित्या हाणून पाडण्यासाठी सगळे लोक , एकत्रित या , हा देश आपला आहे फक्त त्यांचा नाही ,
त्यांच्या काड्या घालून घेऊन परस्परात कळवंड लाऊन घेऊ नका ,, एवढेच या निमित्ताने सांगू इच्छितो 🙏🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत