२९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय संविधानाची मसुदा समिती स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.

आजचा दिवस भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय संविधानाची मसुदा समिती स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.
👉 मसुदा समितीत अनेक मान्यवर सदस्य होते, परंतु वास्तव हे आहे की, संविधान निर्मितीची जबाबदारी जवळपास पूर्णपणे बाबासाहेबांच्या खांद्यावर आली.
👉 इतर सदस्य बहुतेक वेळा अनुपस्थित राहायचे, अनेकदा सुट्ट्या घ्यायचे, किंवा चर्चेत सक्रिय राहायचे नाहीत.
👉 अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन संविधानाचा मसुदा तयार केला.
👉 दिवसभर समितीच्या बैठका, रात्री अभ्यास, लेखन व पुनरावलोकन – असा अविरत प्रवास बाबासाहेबांनी सुरू ठेवला.
💡 त्यांच्या अथक परिश्रमामुळे
• भारताला आज जगातील सर्वात मोठं लोकशाहीप्रधान व सर्वसमावेशक संविधान मिळालं.
• सामाजिक न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्त्वं आपल्या संविधानाच्या मुळाशी आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आजचं भारताचं लोकशाही स्वरूप वेगळंच असतं, कदाचित अपूर्ण राहिलं असतं.
🙏 म्हणूनच आज आपण हा दिवस केवळ मसुदा समिती स्थापन दिन म्हणून नाही, तर बाबासाहेबांच्या संघर्ष, जिद्द आणि दूरदृष्टीला नमन करण्याचा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे.
🔹 “एकटा माणूस संपूर्ण राष्ट्राच भविष्य बदलू शकतो”
याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत