डॉ चंचलाताई बोडके यांनी स्विकारला उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधिक्षक पदाचा पदभार

सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड यांनी डॉ चंचला बोडके यांचे स्वागत
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील उप जिल्हा रुग्णालय गेली चार पाच वर्ष झाली खुप चांगल्या पद्धतीने चालू आहे अनेक कर्मचारी या उपजिल्हा रुग्णालयात काम करतात उपजिल्हा रुग्णालय प्रशासन चालू झाल्या पासुन बरेच काळ डॉ इस्माईल मुल्ला यांनी वैद्यकिय अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळत होते इतर रुग्णालय पण त्यांच्याकडे होते त्यामुळे डॉ सुरेंद्र मडके हे पुर्ण वेळ कार्यभार सांभाळत होते परंतू काही दिवस डॉ पापडे यांच्या कडे होते परंतू आता कायमस्वरूपी वैद्यकिय अधिक्षक म्हणून डॉ चंचला बोडके ह्या नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या बरोबर नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड यांनी शाल श्रीफळ बुके देऊन स्वागत पर सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ सुरेंद्र मडके , परिसेविका निर्मलाताई भालेराव , परिसेविका तोडकरी आदिजन उपस्थित होते .
नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय खूप चांगल्या पद्धतीने चालू असून सदरील सर्व कर्मचारी सर्व रुग्णांचे सविस्तर असे मार्गदर्शन व निदान करत आहेत याचबरोबर नळदुर्ग शहर आणि परिसरातील नागरिक उपजिल्हा रुग्णालयाचा पुरेपूर फायदा घेत असून सर्व सुविधा या ठिकाणी मिळत असल्याने नागरिकात मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे
काही मोजक्या सुविधा व कर्मचारी आपुरी पडत आसल्यामुळे रुग्णाची आडचन होत आहे .जे अत्यावश्यक सेवा पाहिजे आहे ते प्रशासनाने लवकरात लवकर सर्व मशिनरी या ठिकाणी उपलब्ध करून रुग्णाची सेवा करावी अशी या ठिकाणी मागणी होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत