भटके विमुक्त दिन सोहळा

( राहुल हंडोरे यांजकडून )
अंबरनाथ मध्ये साजरा होणार
अंबरनाथ दि. 29 ऑगस्ट :
ठाणे जिल्ह्यातील समस्त भटके विमुक्त जाती जमाती यांचे वतीने दि. 31 ऑगस्ट रोजी अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात भटके विमुक्त दिन सोहळा धूमधडाक्यात साजरा होणार आहे.
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय यांचे वतीने एक जी आर काढला असून विमुक्त जाती भटक्या जमाती सवर्गातील लाभार्त्यांना ओळखीचे प्रमाणपत्रे व विविध योजणांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंबरनाथ मध्ये भटक्यांच्या विविध संघटना एकत्रित येऊन अंबरनाथ येथे भटके विमुक्त दिन साजरा करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. भटके विमुक्त समाजातील पोतराज, गोंधळी, नागपंथी, डवरी गोसावी, नंदिवाले, पोपटवाले, सापवाले, डोंबारी, बंजारा जमातीचे पुरुष आणि महिला पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुकीत सामील होणार आहेत.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. नरहरी झिरवळ, अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड, भाजपचे नेते गुलाबराव करंजुले, राष्ट्रवादीचे नेते सदामामा पाटील, अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी, काँग्रेस नेते प्रदीप पाटील, शिवसेना नेते अरविंद वाळेकर,भटके विमुक्त नेते धनंजय ओम्बासे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच शासकीय अधिकारी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, तहसीलदार अमित पुरी, मंत्रालयातील अवर सचिव, अजित तायडे, मनोहर बंदपट्टे, माजी उप सचिव कैलास भंडालकर आदिना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागपंथी डवरी गोसावी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले भूषविणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत