देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ


लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- २८/८/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३२
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
समता या तत्वाबाबत आपण विचार करूया.
समतेचा अर्थ समजून घेताना आपण मनुष्यमात्र म्हणून विकास करण्यासाठी आपण सगळे सारखेच आहोत. प्रत्येकाला विकास करण्याची सारखीच संधी म्हणजे समता होय. एक मनुष्य म्हणून आपण आपला शैक्षणिक; आर्थिक; सामाजिक; धार्मिक; सांस्कृतिक; राजकीय इत्यादी माध्यमांतून आपण सर्वजण आपला विकास करत असतो.
समतेच्या तत्वानुसार विकास करत असताना आपणास स्वातंत्र्य व बंधुत्व या दोन तत्वांची जोड मिळाली तर प्रत्येकाला विकास करण्यासाठी एक चांगली परिस्थिती निर्माण होते. समाजात समता प्रस्थापित होण्यासाठी माणसाच्या मनात असलेले भेदभाव;जातीव्यवस्था; उच्च निचता; द्वेष; तिरस्कार या भावनांचे परिवर्तन घडवून आणले पाहिजे. याचा अर्थ समता प्रस्थापित होण्यासाठी माणसाने शीलांचे; सदाचाराचे; नीतीमत्तेचे आचरण केले पाहिजे.म्हणजे समता प्रस्थापित होण्यासाठी आपणास खऱ्या अर्थाने मैत्रीचे आचरण करावयास हवे.मनुष्यमात्रामध्ये निस्वार्थ ;निर्मळ मैत्री ची भावना निर्माण झाली तर माणसा माणसातील भेदभाव नष्ट होतील. यानुसार जे मैत्रीचे आचरण करत आहेत.त्यांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये असलेले जातीभेद; वर्णभेद; वंशभेद; भाषाभेद; प्रांतभेद; लिंगभेद यावर समाज प्रबोधन करून सर्व मानव प्राणी हा विकास करण्यासाठी मुक्त राहिल असे वातावरण निर्माण केले पाहिजे.
आरक्षणाच्या तत्त्वाच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात एक प्रात्यक्षिक केले.दहा तगडे घोडे व पाच सहा हडकुळे घोडे आणावयास सांगितले.त्यानंतर त्यांनी हरबऱ्याने भरलेले घमेले घोड्यांच्या समोर ठेवायला सांगितले व सर्व घोड्यांना सोडून देण्यास सांगितले.जे तगडे घोडे होते ते त्या हरबऱ्याच्या घमेल्यावर तुटून पडले व हडकूळे घोडे मागे राहिले.त्यांना हरबऱ्याच्या घमेल्यापर्यंत पोहचता आले नाही.यावरून आपल्या लक्षात येईल की समाजात कमजोर लोक आहेत त्यांना विशेष मदतीची गरज आहे.म्हणून प्रत्येक माणसाला प्रगती करण्यासाठी त्याला संधी व सहाय्य मिळाले तरच तो मानव प्राणी म्हणून इतरांबरोबर विकास; प्रगती करू शकतो.
यात तगडा घोडा व हडकुळा घोडा कोण आहे.तगडा घोडा म्हणजे ब्राम्हणी मनुवादी व्यवस्थेनुसार ब्राम्हण; क्षत्रिय व वैश्य हे मनुवादी व्यवस्थेचे तगडे घोडे आहेत.आजच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानानुसार मागासवर्गीय हिंदू जो की ८५. ०/० आहे.त्याला आपण ओबीसी; एससी; एसटी; एनटी व एसबीसी या वर्गवारी मध्ये पाहतो.हे हडकूळे घोडे आहेत.हे आपल्या लक्षात येईल.२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले.परंतू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३८ साली मनमाड येथील कामगारांच्या परिषदेत सांगितले होते की; लोकशाहीचे दोन शत्रू आहेत एक भांडवलशाही व दुसरा ब्राम्हणशाही यांनी या देशाच्या सत्तेचा ताबा घेतला.जे की मनुवादी विचाराने ग्रस्त होते.ज्यांच्यात जातीय द्वेष व तिरस्कार खच्चून भरलेला होता.अशा मनुवादी लोकांमुळे ८५ टक्के मागासवर्गीय हिंदूंना आजही न्याय मिळत नाही. लोकशाहीच्या नावाखाली भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांनी राज्य करून आमच्या तोंडाला गाजर पुसण्याचे काम केले हे दिसून येईल.म्हणजे प्रामाणिकपणे लोकशाही राबवली गेली नाही हे आजही आपल्या लक्षात येते.कारण ८५ टक्के समाज हा मनुवादी व्यवस्थेमुळे शिक्षण; संपत्ती; व्यापार ; मालमत्ता या सर्व गोष्टींना पारखा होतो. ज्या आरक्षणामुळे देशात बरोबरीचे व समतेचे राज्य स्थापन होणार होते त्याला लोकशाहीच्या मारेकऱ्यांनी नष्ट करण्याकडे वाटचाल केली आहे. म्हणजे ब्राम्हणी मनुवादी धर्म वरिल मागासवर्गीय हिंदूंना संविधानाने दिलेले हक्क;अधिकार; स्वातंत्र्य नाकारत आहे. हिंदू राष्ट्रात मागासवर्गीय हिंदूंना न्याय मिळणार आहे काय? मनुवादी विषमतावादी व्यवस्थेमुळे या देशातील ८५ टक्के वर्ग अज्ञान; गरीबी; दारिद्य्र; शिक्षण;संपत्ती व स्वातंत्र्य याला पारखा होऊन दुःखी जीवन जगत होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समतेला प्राधान्य देणारे संविधान दिले म्हणून या देशातील ८५ टक्के वर्गाला थोडे चांगले दिवस मिळाले.ज्या मनुवादी व्यवस्थेने शुद्रांना ( आताचा मागासवर्गीय हिंदू ओबीसी; एससी; एसटी; एनटी; एसबीसी व बौद्ध) शिक्षण नाकारले होते.ते लोक संविधानामुळे डॉक्टर; इंजिनिअर; वकील; न्यायाधीश; कमीशनर ; जिल्हाधिकारी इत्यादी बाबींमध्ये प्रगती करू शकले.आता या ८५ टक्के वर्गापुढे विषमतावादी मनुवादी ब्राम्हणी धर्माची गुलामी करायची की समतेचे संविधान स्वीकारायचे हा प्रश्न उभा राहिला आहे. या वर्गाने तो विचार गांभीर्याने केला पाहिजे.*
म्हणून छत्रपती शाहू महाराज यांच्या या धोरणाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षणाचे अधिकार समाविष्ट केले.जातीव्यवस्थेची कुप्रथा जी मानवाचे स्वातंत्र्य ; समता व बंधुत्व नाकारत होती.तसेच विशिष्ट उच्च जातीचे हित फक्त पाहिले जात होते. त्या व्यवस्थेला प्रथम हादरा हा तथागत गौतम बुद्ध यांनी दिला.त्यांनी जातीव्यवस्था नाकारली.मानव म्हणून सर्वजण माझ्या सारखे बुद्ध होऊ शकतात.हे स्वातंत्र्य देणारे भगवान बुद्ध हे पहिले जगातील मानवतेचे पुरस्कर्ते आहेत.भगवान बुद्ध यांच्या धम्मामध्ये समता;स्वातंत्र्य; बंधुत्व ही मानवी विकासाची तत्वे असल्याने एक निकोप समाज निर्माण होऊ शकतो. भगवान बुद्ध एके ठिकाणी म्हणतात की बऱ्याच नद्या ह्या सागराला जाऊन मिळतात.त्या जेव्हा समुद्रात मिसळतात तेव्हा आपण हे यमुनेचे पाणी; हे गंगेचे पाणी असे सांगू शकत नाही.म्हणजे भगवान बुद्ध यांच्या संघात दाखल झालेल्या माणसाची जात ;धर्म; पंथ; वंश हे नष्ट होऊन तो फक्त एक मानव म्हणून बौद्ध धम्माचा भाग होऊन जातो. म्हणजे संघात भेदभाव संपुष्टात येतो. प्रत्येकजण समतेने ; ममतेने वागून एकमेकांना मैत्री च्या आचरणाने मदत करत असतात.
यावरुन आधुनिक जगाला धर्म; जात; पंथ; वंश श्रेष्ठत्व; भाषा; रंग; प्रांत; देश या सर्व भेदांच्या वर उठणारा सुजाण नागरिक हवा आहे.आणि तो फक्त बौद्ध धम्माच्या विचारांतूनच घडू शकतो. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना आव्हान केले की; तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल तर बौद्ध धम्म स्वीकाराशिवाय पर्याय नाही.बौद्ध धम्मानेच भारताचे कल्याण होणार आहे. नव्हे तर जगाला बुद्धांच्या धम्माची कास धरावी लागेल.जगाचा उद्धार बौद्ध धम्मानेच होणार आहे.कारण जगातील मानवाला सुख; शांती; समाधान हवे असेल तर बुद्धांच्या धम्माची गरज आहे.

उर्वरित भाग पुढे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!