
मुंबई, १५ ऑगस्ट – डॉ. आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय आयु. संजीव बोधनकर साहेब महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. (डॉ.) यशोधरा वराळे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. गवई, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दीपक बनसोडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. एस. पाटील, पर्यवेक्षक प्रा. ए. डी. वानखेडे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सचिव आयु. संजीव बोधनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीताने परिसर देशभक्तीने भारून गेला. विद्यार्थ्यांकडून देशभक्तिपर गीतांवर आधारित परेड, गीतगायन आणि नृत्यप्रस्तुती सादर करण्यात आल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. टी. जी. कोकाटे यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयापासून वडाळा रेल्वे स्टेशनपर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. आभारप्रदर्शन ए एन ओ कॅप्टन प्रा. जी. एन. कुवर यांनी केले. शेवटी एन.सी.सी. गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत