मंगळवार,५ ऑगस्ट 2025

विशेष… श्री तुकाराम मुंढे आय ए एस यांची बदली..श्री मुंढे यांची सचिव,दिव्यांग कल्याण विभाग,मंत्रालय या पदावर नियुक्ती… शासनाने आज ५ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या…
.महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर, वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडला जाणार, भूसंपादनाला मान्यता, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळांची कबुली
दिवाळीनंतर ऑक्टोबर अखेरीस महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली माहिती
मनसेसोबत युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा; महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
मुंबईत २९ ऑगस्टला होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी जे नेते येणार नाहीत, त्यांना आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा, मनोज जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा
अंतरवाली सराटीत केलेली चूक पुन्हा करु नका, अन्यथा तुमच्यासह पंतप्रधान मोदींना किंमत मोजावी लागेल; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा
दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री तातडीने हटवण्यात येणार, त्यांना बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले जाहीर
कबुतरखान्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची एक समिती नेमण्यात येणार, राज्य सरकारच्या निर्णयानंतर जैन समाज आनंदी
..कंट्रोल फिडिंग करायला कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत, कबुतरखाना बंद केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना टोला
कबुतरांना दाणे टाकू नका सांगताच लोखंडी रॉड घेऊन आला, मुंबईजवळील मीरा-भाईंदरमध्ये महिलेसह वृद्ध वडिलांना मारहाण
ठाकरे बंधूंविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार, आता थेट कोर्टात खेचणार, मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून याचिका दाखल
नागपुरातील येस बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचं आंदोलन, बँकेत सिनेस्टाईल राडा; पोलिसांसमोरच बँक अधिकाऱ्याला कानाशिलात लगावल्या
पुण्यातील कोथरुड पोलिसांकडून छळ, दाद मागूनही तक्रार घेईनात, तरुणी आता थेट हायकोर्टात जाणार, पुरावे गोळा करायला केली सुरुवात
आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश; आरती साठेंच्या नेमणुकीवर रोहित पवारांचा सवाल, तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 सालीच पक्षाचा राजीनामा दिला होता, भाजपकडून स्पष्टीकरण
मुंबईत रस्ता क्रॉस करताना भरधाव बाईकनं उडवलं, तरुणानं जागेवर जीव सोडला, सांताक्रुझ पश्चिम परिसरात अपघाताचा थरार
पुण्यात धक्कादायक घटना, गाडीला कट मारून घासल्याच्या राग; मित्रांना, भावाला मारण्यासाठी बोलवलं, थेट पिस्तूल काढली आणि केला गोळीबार, घटनेनंतर सुप्रिया सुळेंची संतापजनक पोस्ट
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन, दिल्लीत उपचारांदरम्यान वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
उत्तराखंडमध्ये ढगफुटी, दुर्घटनेत 50 जण बेपत्ता, चार जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर
१०…इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक
ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अॅप येणार, परिवहन खात्याचा मोठा निर्णय, ST महामंडळाचं ॲप ‘छावा राईड’ नावाने धावणार; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत