
असतात जे कायम
समतेच्या विरोधात
समरसतेची भूल टाकून
बहुजनांना फसवतात
वर्णांध व्यवस्थेचे लाभधारक
असतात कावेबाज
समरसतेच्या मुखवट्याचा
लेतात ढोंगी साज
खोटा खोटा साज त्यांचा
असतो भरजरी फार
पण संपवत नसतात कधीच ते
शोषण व्यवस्थेचा आजार
पुरोहितशाही भांडवलशाहीला
जपत असतात ते कायम
सोनेरी पिंजऱ्यात अडकवून
बहुजनांना करतात गुलाम
समतावाद्यांनी फाडायचा असतो
समरसतेचा मुखवटा
त्यांच्या दांभिक चालीवरती
हाणायचा असतो सोटा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत