कायदे विषयकदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

खरे तर मला खूप लिहायचे आहे ,,,,!


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आज भारतीय लोकशाही वर , भारतीय राज्य घटनेवर , धार्मिक सलोख्यावर जे वादळ घोंगावत आहे ,, धार्मिक उन्मादी वातावरण निर्माण करून अल्पसंख्यांक आणि सामाजिक राजकीय धार्मिक असंमान व्यवस्थेच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारा आधारे धर्मांतरित होऊन ब्राह्मणी वर्चस्वाच्या गुलामी विरोधात बंड करुन उठलेल्या नव बौद्ध समाजाला ज्या पद्धती ने टार्गेट केले जात आहे , ते आज ना उद्या होणारच होते ,
हजारो वर्ष विषम धर्म व्यवस्थेच्या माध्यमातून वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्थेचा उगम झाला , ब्राम्हणी धर्म संहितेने त्याला कायद्याचे स्वरूप दिले , आणि गाव खेड्यातील कृषी आधारित उद्योगासाठी जात नियंत्रित कामाचे स्वरूप देऊन सामाजिक , आर्थिक , राजकीय ढाचा बनवला , तो मुघल काळ असो किंवा त्या पूर्वीची राजेशाही असो याच आधारे चालत आला .
ब्रिटिश सत्तेमुळे आणि त्यांनी विकसित केलेल्या औद्योगिक सुधारणा , आधुनिक शासन व्यवस्था यातील भौतिक बदलाने ती व्यवस्था थोडीशी ढासळली ,, पण ती उध्वस्त झाली नाही ,, जातीचे अस्तित्व हे कायम राहिले ,,
स्वातंत्र्या नंतर हा देश कोणत्या प्रकारचे राष्ट्र असावे ? याचा संघर्ष सुरू झाला , जे उच्च वर्णीय होते व या धर्म व्यवस्थेचे फायदे ज्यांना मिळत होते त्यांच्या दृष्टीने संभाव्य राजवट धर्माधिष्ठित असावी असा जोरकस प्रयत्न झाला ,
पण याचीच प्रतिक्रिया म्हणून आमचे ही स्वंतत्र राष्ट्र असावे अशी भावना ” मुस्लिम लीग द्वारे मांडली गेली ,,
याचा परिणाम म्हणून अंखंड भारताचे विघटन होऊन दोन राष्ट्र निर्माण झाले
आज अस्तित्वात असलेला एस सी , प्रवर्ग हा याच हिंदू व्यवस्थेचा भाग म्हणून गणला गेला .
त्यांचे साठी स्वंतत्र राष्ट्र तर सोडाच पण त्यांचे लोक प्रतिनिधी ही स्वंतत्र दृष्ट्या निवडले जाण्याचा मार्ग ही बंद करण्यात आला ,
लोकप्रतिनिधी निवडला जात असताना सवर्ण असो किंवा दलीत असो त्यांना दोघांनी ही मतदान करायचे असा संयुक्त मतदार संघाचा फॉर्म्युला अस्तित्वात आला ,, आणि तिथेच तो घात झाला , दलिता मधील स्वप्रज्ञा असलेल्या उमेदवारांना नाकारून व्यवस्थेला शरण जाणारे लोकप्रतनिधीं निवडले जाऊ लागले ,,
आपल्या पुरातन संस्कृती जीची वहिवाट वर्ण श्रेष्ठत्वाच्या आधारे ज्यांच्या कडे होती त्यांनी राजसत्ते वर आरूढ होण्याचे प्रयत्न सातत्याने केले ,पण त्यांना त्यात यश येत नव्हते ,, तेंव्हा काँग्रेस बलवान होती , त्यांची राज सत्तेवर असलेली पकड अधिक मजबूत राहिली ,,
दुसऱ्या बाजूने आपली सत्ता आणयचीच या हेतूने कार्यरत राहून समाज व्यवस्थेतील बदल वैचारिक संघर्ष पेरणारी बौध्दीक फळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ने मैदानात उतरवली ,, कोणाला ही न दुखावता ते लहान मुलांना गोळा करायचे , त्यांच्या समवेत खेळायचे , त्यांना हिंदू राष्ट्र त्याचा गौरवशाली इतिहास आणि त्या सोबत परकीय आक्रमणे , त्यांनी संस्कृतीवर घाव घालण्यासाठी केलेले मूर्ती भंजन ते थेट स्त्रियांच्या लैंगिक शोषणा चे करुण किस्से सांगून ते मेंदू घडवत राहिले ,,
सरदार वल्लभ भाई पटेल यांनी गांधी वधा नंतर संघावर बंदी आणली , पण ती उठवण्यात आली ,, आणि त्या साठी एक करार झाला , आम्ही हे संघटन राजकीय दृष्टीने चालवणार नाही .
राजसत्ते वर कुणी असावे ? याचा निकाल लागला होता आणि याचा फायदा सामाजिक व्यवस्थेने ठरवून दिलेल्या वर्गालाच होणार होता ,,
म्हणून अनेक दशके उलटून गेली
राजकीय सत्तेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने सत्ताधारी घराणी निर्माण केली , त्यांच्या हातात व्यवस्थेचे दोर दिले , आर्थिक विकास करणाऱ्या संस्था , शिक्षण थोडक्यात गल्ली पासून दिल्ली पर्यंत असे ब्रँड निर्माण झाले ,
संघाच्या हातात काय होते ?
ते सत्ताधीशांच्या तुलनेत कफल्लक होते ,, पण त्यांचा सामाजिक दर्जा उंच होता , त्यांची श्रद्धा त्यांच्या मनातील राष्ट्र होते , ज्या राष्ट्रवादाच्या आधारे त्यांना नवा हिंदुस्थान घडवायचा होता ,
ते हेच उद्दिष्ट घेऊन संघाच्या शाखा चालवत राहिले , कित्येक पिढ्या ते खपत गेले , त्यांनी उद्याच्या स्वप्नासाठी स्वतःला गाडून घेतले , ते नव्या पिढ्या घडवत गेले ज्या त्यांच्या विचारांच्या होत्या , त्यांचा वैचारिक पाया भक्कम होत गेला ,
माणसात स्व धर्म प्रेम असते ,ते त्यांनी जागवले , त्यांच्यात भाषा प्रेम असते , प्रांताभिमान असतो , त्यांच्यात त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रेम असते , त्या इतिहासातील , राजे , आणि पौराणिक कथेतील देव त्यांच्या धार्मिक संकल्पनेतील हिरो म्हणून होते ,, त्यांचे पूजन करून त्यांनी समुदायाच्या श्रध्देला जागवल,
हिंदू राष्ट्रवादाच्या आड आलेल्या प्रत्येक इतिहासातील सत्तेला त्यांनी शत्रू म्हणून घोषित केले ,
जे आक्रमणकारी होते , त्यांचा धर्म वेगळा होता , त्यांची संस्कृती वेगळी होती , त्यावर ते प्रहार करत राहिले ,, त्याच सत्तेचे राहिलेले अवशेष म्हणून अस्तित्वात असलेल्या मुस्लिम , ख्रीच्छन धर्मियांना सांस्कृतिक आक्रमक शत्रू म्हणून त्यांची प्रतिमा समाज मनात रुजवत राहिले ,
” धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर” हे बिंबवण्यात ते यशस्वी झाले , यातून एखाद्या दुसऱ्याने घाई गडबडीत फादर असलेल्या कुटुंबीयांना जीवंत जाळले ,, ती नर संहाराची सुरुवात होती ,,
तिचा विस्तार होत गेला ,,
धर्मांतर विरोधी कायदे निर्माण करणे त्यांना सुलभ झाले ,
इकडे काँग्रेस ची घराणी मजबूत होती , पण तीही माणसेच होती , त्यांचा सांस्कृतिक धर्म एकच होता ,
ते निवडणुका जिंकणे जाणत होते ,, माणसांच्या भौतिक गरजा पूर्ती करणे हेच सत्तेचे काम आहे ,, त्या पूर्ण केल्या की बस झाले असे ते समजत राहिले ,
त्यांच्या सत्तेचा पाया असलेली माणसे हळू हळू विकेंद्रित होत होती , ती वेगवेगळ्या जातींची , धर्माची , भिन्न आर्थिक स्तरातील होती , त्यांचे त्यांचे आयकॉन त्यांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू होते ,,
समाज म्हणून ते एक होते , पण जात म्हणून ते जात संघटित होत होते , त्या प्रत्येक आदर्शाची ते पूजा करू लागले , ज्यांना सांस्कृतिक राजकीय सत्तेचा वारसा होता त्यांचे काम सोपे होते , त्यांचे सांस्कृतिक वारसे एक होते , संघ मानत असलेल्या हिंदू राष्ट्र वादाचे ही ते आदर्श होते ,,
त्यांच्या तुलनेत धर्म निरपेक्ष तत्वज्ञान घेऊन निघालेला समाज अस्तित्वात च नव्हता , ती राजकीय व्यवस्था चालवण्याची भाषा होती ,,
काँग्रेस ने चिंतन करणे सोडले होते ,, त्यांना सत्ता टीकवण्या साठी अश्या चिंतनाची , वैचारिक पिढ्या घडवण्याची गरज वाटत नव्हती ,
ते गाफील राहिले ,,
यातून आक्रमणाच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसण्याचे मिशन त्यांनी हातात घेतले ,,
अयोध्या हे त्याचे केंद्र ठरले ,, “राम मंदिर निर्मिती चां संकल्प त्यांनी सोडला ,,
बाबरी पाडण्याची कृती ही साधी नव्हती ,, मोठा प्रदीर्घ संघर्ष होणार हे त्यांना ज्ञात होते ,, त्यात नर संहार होणार होता हे ही त्यांना ज्ञात होते ,,
ते युद्ध खेळण्यासाठी त्यांनी माणसे निर्माण केली होती ,, जे त्या साठी लढणार होते ते सगळे ब्राम्हण नव्हते , बाहुजनातील माणसे त्यांचा कच्चा मालं होता ,,
त्याची प्रतिक्रिया म्हणून ज्या दंगली , बॉम्बस्फोट झाले त्यातून या सांस्कृतिक लढाईला सुरुवात झाली ,
या लढाई ने सर्व अंतर्गत संघर्षावर मात केली , “कमंडल ने मंडल ला कवेत घेतले ,,
हिंदू राष्ट्र वादा हा प्रवाह पुढे सरकत राहिला , काळाची अपत्य म्हणून याचाच धागा असलेली छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाची गरज ही हळू हळू लुप्त होऊ लागली ,,
हिंदू राष्ट्र वादाचा सार्वभौम एकच बलाढ्य पक्ष असावा या दिशेने त्यांनी टाकलेली पाऊले राजमार्गात रूपांतरित झाले ,, आणि इथेच काँग्रेस ने निर्माण केलेली संस्थनिक डळमळीत झाली , त्यांच्या कडे वैचारिक अधिष्ठान नव्हते , त्यांच्या साम्राज्यात त्यांचे पाठीराखे असणारे लोक हे व्यक्तिगत फायद्या चे लाभार्थी होते ,, पण ज्या सत्तें द्वारे त्यांना लाभ मिळणार होते ती सत्ता त्यांच्या मालका पासून ही दूर जाणारी होती ,, तिला पकडुन ठेवण्याची गरज निर्माण झाली , आणि ” घर फिरले की घराचे वासे ही फिरतात” या उक्ती प्रमाणे त्यांच्या मालकाने पक्षीय बदल केला की ही माणसे त्या पक्षाची होणार ,,,
माणसांना पक्ष नव्हते , आणि विचारधारा ही नव्हती ,, ते ढिसाळ माणसांचे गठ्ठे होते ,,
भाजप ने सगळ्या ऐऱ्या गैऱ्या ना एकत्रित करत बसण्याचा मार्ग स्विकारला नाही , त्यांनी हिंदुत्वाचा घोडा अस्वमेघ यज्ञ म्हणून सोडला ,,
” असेल हिंमत तर अडवून दाखवा “
कधी तरी प्रादेशिक अस्मिता , किंवा जात अस्मिता आधारे या हिंदुत्व वादी घोड्याला रोखायचा प्रयत्न झाला , त्या साठी प्रबळ जात केंद्रीत लढा उभा केला गेला ,, एक वादळ निर्माण केले जात असताना ही ते शांत होते ,, याचे कारण त्यांचा जात अभिमान , त्यांची जात अस्मिता याचे शेवटचे अधिष्ठान ही हिंदू राष्ट्र च होते ,,
त्यांना वैचारिक विरोध करू शकेल असा एकच फोर्स होता , आणि तो होता आंबेडकरी विचारधारा ,,,
पण त्या विचारधारा आधारे उभी राहिलेली नेतृत्व वैचारिक दृष्ट्या तितकी प्रगल्भ होती का?
ती त्यांच्या विचारधारेशी प्रामाणिक तरी होते का?
कांहीं अपवाद वगळता , त्यातील बहुतेक जण सत्ता प्राप्ती च्या आकांक्षेने व्याकूळ झाले होते , कांहीं ना आर्थिक स्थैर्य हवे होते , त्यांनी जो प्रवाह सत्ता निर्मिती करू शकतो त्याची कास पकडली ,, आणि हा प्रवाह पतीतांचा लोंढा वाहत राहिला ,,
ते आत्ता समाजाचा अपमान ही मूकपणे गिळून शांत राहणे पसंत करतात ,, त्यांचे कार्यकर्ते ही तेच धोरण पुढे चालवतात ,
ते हा हिंदुत्वाचा प्रवाह रोखण्यास सामर्थ्यवान नाहीत , आणि भारतीय समाज रचनेत ते अजून ही
“हिणकस” स्तरावर आहेत ,
शोषित जात समूहातील तो प्रवाह आहे पण तो ही विभाजित झाल्याने त्यातील कांहीं प्रवाह किमान दिसतात कांहीचे अस्तित्व शोधावे लागते ,,
अश्या विकेंद्रित अवस्थेत ते अधिक अशक्त झाले ,
प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेल्या बौद्ध धम्मा ची दीक्षा त्यांनी घेतली , पण हाच प्रवाह ते पुढे सरकवू शकले नाहीत , शोषित पीडित एस सी, एस टी , व्हीजेएनटी
समुदायातील गैर बुध्दीस्ट समुदाय ” हिंदुत्वाच्या प्रवाहात खेचण्याचे काम चालू राहिले , त्या साठी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता भाजपला लागलीच नाही ,,
आंबेडकरी समाज म्हणून जन्माने आंबेडकर वादी बनलेले लोक समूह
भारतीय राज्य घटना ,, आणि तिने स्थापित केलेल्या प्रशासन न्याय संस्था आदी वर आशावादी राहिले की कांहीं ही झाले तरी ही व्यवस्था कोणी बदलवू शकणार नाही ,,
सत्ता घटनात्मक ढाचा पोखरून टाकते , हे त्यांच्या गावी ही नव्हते ,,
एक काळ असा ही राहिला की , घटनादत्त अधिकार म्हणून आरक्षण मिळत गेले ,, खाजगीकरण करून त्यांनी त्यावर मात केली ,,
आंबेडकरी समाजाची आर्थिक शैक्षणिक कोंडी करत त्यांना व्यवस्थेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आले ,
जन सुरक्षा कायद्याची व्याप्ती वाढविण्यात आली ,
त्यांच्या श्रद्धा स्थानावर हल्ले चढवण्यात आले ,
“खैर लांजी ते रमाबाई नगर पासून सुरू झालेला प्रवास ” भीमा कोरेगाव” पर्यंत येऊन ठेपला ,,
आत्ता उरली सुरली नांगी ठेच्ण्यासाठी परभणी ते कोथरूड पार पाडले गेले ,,
सत्ता असली की मालेगाव असो की उन्नाव ,, आरोपींना अभय देता येते ,,
ज्या एट्रोसिटी चे कवच कुंडल घेऊन ते वावरत होते तो कायदा ही त्यांनीच ( प्रस्थापित वर्गाने) बनवला होता त्याला निष्प्रभ करण्यासाठी ही तेच उभे राहिले ,, आणि राहणार ,,,
ज्या न्यायालयातून कायद्या द्वारे न्याय मिळेल हा आशावाद आहे तो ही कांहीं काळाने तकलादू ठरेल ,,,
बे मौत सडवून ठेवण्याची किंवा मारण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे ,,
अश्या ही स्थितीत लिहिण्याच धाडस आमच्या सारखे वेडे लोक करत राहणार ,,
असे असंख्य लोक आहेत ,, ते गोंधळलेले आहेत , एका भयानक गुलामी कडे शोषितांचे जात समूह ढकलले जात आहेत याने ते अस्वस्थ आहेत ,
शत्रू बलाढ्य आहे , आर्थिक , सामाजिक , राजकीय दृष्ट्या ते भक्कम आहेत ,, आणि हे अस्वस्थ आत्मे कफल्लक आहेत ,,
आणि अश्या कफल्लक माणसांचे कोण ऐकणार?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!