
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची फेर निवड
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री मा ना रामदास आठवले यांची रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी फेर निवड झाल्याबद्दल मुंबई येथे संविधान निवासात तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्ह्याच्या वतीने युवक तालुकाध्यक्ष शुभम कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. दि. २ऑगष्ट शनिवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन मुंबई येथे पार पाडली. तुळजापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील आणि तुळजापूर तालुक्यातील विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सदस्य एस के चले, मराठवाडा कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, मराठा आघाडीचे उपाध्यक्ष रविराज पाटील,धाराशिव जिल्हा सरचिटणीस मुन्ना ओहाळ, धाराशिव तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, रंजीत मस्के, तुळजापूर युवक तालुका अध्यक्ष शुभम कदम, युवक तालुका सरचिटणीस प्रदीप शिरसाट, तुळजापूर शहराध्यक्ष वैजनाथ पाडागळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत