होती माय, माउली,

🙏🙏मनोगत🙏🙏
.. ..... .मुंबई..........
होती माय, माउली,
मोकळी ढाकळी,
पसारा सात बेटांचा,
सुंदर, आकर्षक अन् वेढा सागराचा,
हेरला किनारा बंदराचा,
सजला व्यापार इंग्रजांचा.!
दिली रुपया वार जागा ,
गिरणी मालकांना,
धडधडले कारखाने, उद्योग नाना,
स्थिरावले उद्योगपती, कारखानदार,
सोयी, सवलती मिळवताना.!
बँका, कार्यालये,उद्योगधंदे,
रेल्वे, रस्त्यांचे जाळे, गल्लीबोळात,
बेस्टच्या बसने,
करता येई, प्रवास आरामात,
गजबजली विविध बाजारांनी, धंद्यांनी, चौपाट्यांनी, मनोरंजनाने,
मिळाले काम, लाखो हातांना,
धाव घेती देशभरातील,
सगळे वेगाने.!
मायने माझ्या साऱ्यांना,
घेतले कुशीत,
जपले जिव्हाळ्याने प्रेमात,
न केला दूजाभाव,
अन भेदभाव,
वाढले शहर, टाकून भराव,
वाढल्या झोपडपट्ट्या,
न सोडले डोंगर,
किनारे नदी अन् नाल्यांचे.!
आहे ती अन्नपूर्णा,
कष्टाची भाकरी देणारी,
आहे ती शिक्षणाची, विद्यानगरी,
कर्मभूमी असे लाखोंची,
गुणांना वाव देणारी,
जगभर नाव, दुमदुमवणारी,
कुठे नव्हे ते ,
पाणी विकून, पोट भरणार्यांची ,
धन्वंतरी असे ती, गोर गरीबांची,
मोफत अथवा अल्प दरात ,
उपचार देणाऱ्यांची .!
असो धुवाधार पाऊस,
दंगल असो की,
होवोत अनेकानेक बॉम्ब स्फोट,
की कट कारस्थाने अतिरेक्यांची,
असो संकट, कितीही बिकट,
गती न थांबली, तिच्या चक्राची,
हादरली, क्षणभर घुटमळली,
पण पुन्हा झेपावली,
अधिक जोमाने,
न थांबता, गती तिची.!
न थांबता, गती तिची.!!
न थांबता, गती तिची.!!!
आपला,
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…05/08/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत