कायदे विषयकदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मनुस्मृती जगातील सर्वोत्तम ग्रंथ !!

विवेक अग्निहोत्री ह्याचा दावा !

🌻रणजित मेश्राम.

जो ग्रंथ अत्यंत घृणित ग्रंथ म्हणून भारतात प्रचारित आहे, ती मनुस्मृती, जगातील सर्वोत्तम ग्रंथ असल्याचे एका बहुलक्षित तरुणा कडून बोलल्या जात आहे.

तो एव्हढेच बोलून थांबत नाही, जगातील बहुतेक political thinkers या ग्रंथाच्या सर्वोत्तमतेची मान्यता देतात. शिवाय या ग्रंथात विशद केलेली न्यायव्यवस्था, राज्यशासन, मुद्रा विनिमय याच्या श्रेष्ठतेची कबूली देतात. याच ग्रंथाचा आधार घेउन चाणक्य, अशोक व गांधी यांनी आपली वैचारिकी समृद्ध केली. हे जेव्हा तो बोलत असतो तेव्हा सभागृहातून प्रतिसादाच्या प्रचंड टाळ्या पडत असतात. तो रेटून बोलत असतो. आपले पहिले संविधान तर हेच होते. ज्या text ची जग स्तुती करते त्या text ला इथे या देशात कवडीची किंमत नाही. उलट तिरस्कार केल्या जातो. केवळ चुका सांगितल्या जातात. हे सर्व कुणामुळे ? केवळ या leftist मुळे. यांनीच घृणा पेरली. यांच्या घृणापेरणी मुळे आम्ही आमच्या देशाला हीन समजलो. आमच्या थोर संस्कृतीला तुच्छ समजलो. यांनी सांगितलेल्या faultline ला आम्ही खरे समजत आलो. यामुळे या देशाचे वाटोळे झाले.

पूढे तो खूपकाही बोलत असतो. हंशा आणि टाळ्यांची पखरण असते. संवाद शैलीत तो बोलतो. हिंदी,इंग्रजी दोन्हीत बोलतो. गेली चार वर्षे तो सतत व्याख्यानावर आहे. कधी या शहरात, कधी त्या शहरात. देशात, विदेशात. speechline ठरलेली तीच. मुलाखतींचा पण सपाटा लावलाय. कोण हा तरुण ? याचे नाव विवेक अग्निहोत्री आहे. लेखक व फिल्म डायरेक्टर. आतापर्यंत याने चाकलेट, ताश्कंद फाईल व बुध्दा इन ए ट्राफिक जाम हे तीन सिनेमे डायरेक्ट केले आहेत. चवथा ‘काश्मीर फाईल्स’ गाजला. मुंबइत असतो. पण हा प्रकाशझोतात तेव्हा आला जेव्हा याने URBAN NAXALS हे पुस्तक लिहिले. अलिकडच्या काळातील हे पहिले पुस्तक असावे, ज्याचे प्रकाशन समारंभ वेगवेगळ्या शहरात झाले. शिवाय ते समारंभ याने किंवा प्रकाशन संस्थेएेवजी लोकांनी उत्स्फुर्तपणे केले.

इतके लोकबळ याला कसे मिळत असेल ? संघ वर्तुळाला उघडपणे ज्या गोष्टी करणे वा बोलणे अडचणीचे वाटते, त्या गोष्टी हा बोलतो. ते संघवर्तुळाला हवे असते. शिवाय लोकांना ही ते जाहीर ऐकायची taste यावी हेही यातून असते.

याच्या भाषणात, या खंडातील त्या पृष्ठावर अन त्या पृष्ठातील त्या ओळीवर असे काही नसते. निव्वळ भावनिकता. राष्ट्रश्रध्देचा

full dose असतो. श्रोतेही तसेच असतात. हिंदू थिंकींग, हिंदू लाइन, हिंदू सिव्हिलायजेशन, फाल्टलाइन, माइंड कँप्चरिंग, फेमिनिज्म, कास्ट प्राब्लेम, नँरेटिव्ह, स्पेस, राईट वींग, लेफ्ट वींग, आयडियालाजिकल रिजेक्शन, रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन हे सर्व असते. विषमता व जात प्रश्न असूनही हा देश महान कसा, हेच तो सांगतो. स्रीमुक्तीचा तर तो घोर विरोध करतो. अन लोक आनंदाने टाळ्या पिटतात.

संपूर्ण भाषणात हा आंबेडकरवादी किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत नाही. यात शिताफी जाणवते. सारा रोष डावे, कम्युनिस्ट, लेफ्टिस्ट यांचेवर व्यक्त करतो. नावे घेउन टीका करतो. याच डाव्यांनी हिंदू व मुस्लिम व दलित अशी फाळणी केल्याचे सांगतो. एका भाषणात मात्र, आंबेडकर वआंबेडकरीज्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून, आंबेडकरीज्मच्या आड दलित आपले दुबळेपण लपवित असल्याचा आरोप करतो. नजिकच्या काळात रिव्हर्स डिस्क्रिमिनेशनची लाट येईल असा इशाराही देतो. एक खरे, डाव्यांचे नाव घेउन हा गडी, आंबेडकरवाद्यांना फैलावर घेत असतो. कारण धर्म, संस्कृती, समाजव्यवस्था यावर डाव्यांच्या तुलनेत आंबेडकरवाद्यांनीच कठोर टीका केली आहे. विवेक अग्निहोत्रीला आड मार्गाने श्रोत्यांवर जो परिणाम साधायचा आहे,तो ते साधतोच. वरुन चलाखी अशी की, त्याची टँगलाईन I am Budha, Budha speaks अशी आहे. शिवाय त्याच्या फाउंडेशनचे नाव I am budha foundation असे आहे. याचे कार्यक्रम आयोजित करणार्या संस्था, हिंदू युवा मंच ( रायपूर ), पाथेय कण संस्थान ( दिल्ली), भारतीय विचार मंच (सुरत ) अशा स्वभावाच्या असतात. शिवाय साबरमती ग्राउंड ( जे एन यू), कलकत्ता विद्यापीठ येथेही मैदानी भाषणे झाली आहेत.

अर्बन नक्सल हे पुस्तक तर यांनीच लिहिले. तेव्हापासून हा शब्द खूप प्रचारात आला. याच पुस्तकावर Urban Naxals, behind the book and beyond the book असे कार्यक्रम झाले. आता मात्र याची line विस्तारते आहे. जंगलातील सत्य,असत्य हिंसक नक्षली कारवाया पासून प्रारंभ झालेल्या या कथित शोधक अर्बन नक्षलचा कवटाळा आता विस्तारतो आहे. अर्बन नक्षल शब्द उच्चारला की आपल्यापूढे एक प्रतिमा उभी रहायची. जंगलातील नक्षल कारवायांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे शहरी लोक असावेत. आता तेव्हढेच नाही. आता याच्या मते, जे जे या देशाच्या संस्कृतीला तुच्छ लेखतात, सरसकट स्वीकारीत नाहीत, ते सर्व अर्बन नक्षल.आलीकडे ही संज्ञा महाराष्ट्रातील राज्यशासनाने उचललीय. ती त्यांच्या राज्यकारभाराचा सुरक्षाकवच झालीय.

कधी कधी भाषणाच्या वेळी हा अग्निहोत्री विचारतो, या संपूर्ण नँरेशनने आपणाला डावे उजवे कळले असेल. मग मला सांगा, प्रभू राम कोण असतील. डावे की उजवे? सभागृहातून उजवे आवाज येतो. मग कृष्ण? तर तेही उजवे. गांधीजी? ते पण उजवे. मग सांगा पत्रकारात डावा कोण? जोराने उत्तर.. रवीशकुमार. दुसरे नाव…उत्तर..बरखा दत्त. आता तिसरेही सांगा? उत्तर..राजदीप सरदेसाई.

बरेचदा, तो हिटलर चे वेगवेगळे संदर्भ देत अप्रत्यक्ष स्तुती करतो.

 अशी अकल्पित अशी डावी-उजवी फाळणी या देशात सुरु आहे. याला कोणताही आधार नाही. यातली भय सूचकता ही की याला जल्लोषात टाळ्या पडत आहेत. प्रचारकी द्वेषाने कळस गाठला की काय? याचमुळे देहबोली सुध्दा आक्रमकतेकडे जात आहे.

 याला म्हणतात मानसिक पेरणी.ती अव्याहत सूरु असते.आपण चौकस असावे.लक्ष असू द्यावे.

म्हणून प्रपंच….!

रणजित मेश्राम. लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!