दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

हेडलाईन्स शुक्रवार, २५ जुलै २०२५

१…शिवसेना शिंदे गटाचे चार, भाजपमधूनही दोघे रडारवर; ‘रमीसम्राट’ कोकाटेंसह 8 मंत्र्यांची विकेट पडणार, शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सनसनाटी दावा

सुधीर मुनगंटीवारांची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा, राहुल नार्वेकर मंत्री होण्याची चिन्हं; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, बातम्यांपेक्षा माझा पक्षाच्या नेतृत्वावर जास्त विश्वास

२…कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणात खांदेपालटाचा पर्याय; रमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् सुनील तटकरेंच्या बैठकीत चर्चा

अजितदादांनी दोन दिवस मागितलेत, कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा; उपमुख्यमंत्रीअजित पवारांच्या भेटीनंतर छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना विश्वास

३…झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
पुण्यातील कंत्राटदाराला झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी अटक, जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्याच्याकडेच 108 नंबरच्या ॲम्बुलन्सचे कंत्राट; राऊतांनी श्रीकांत शिंदे कनेक्शन जोडलं

४…काँग्रेस नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता; काँग्रेसवर नाराजी उघड, शेरोशायरीतून संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे

नाशिकमधील सुनील बागुल, मामा राजवाडेंपाठोपाठ काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या दाव्याने भुवया उंचावल्या

५…जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ, तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन तस्करांचा पाठलाग
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात HIV बाधित मुलीवर अत्याचार; गर्भपातामुळे खळबळजनक घटना उघड, महाराष्ट्र हादरला

६…वाल्मिक कराडची विजयसिंह बांगरांच्या पत्नी सोबतच्या संवादाची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल; पतीसह सासरच्यांनी छळ केल्याचा पत्नीचा आरोप, घराबाहेर काढलं, वडिलांकडून 5 लाख हुंडाही घेतला

धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक करडाला पोटनिवडणूक घ्यायची होती; बाळा बांगर यांचा धक्कादायक आरोप

७…उल्लू, अल्ट बालाजीसह बोल्ड कंटेट दाखवणाऱ्या 25 APP वर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

‘ती काल स्वप्नात येऊन म्हणाली, ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये’, आईच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, मामाच्या घरी लावली गळ्याला दोर, सोलापुरातील घटना

८…मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? अभिजात दर्जा हवाच कशाला? अभिनेत्री केतकी चितळेची वायफळ बडबड, वादग्रस्त प्रश्नांनी ओढवून घेतलाय वाद

पत्नी ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चा, अखेर अभिषेक बच्चननं मौन सोडलं; म्हणाला, अशा अफवा खूप वेदनादायी असतात

९..मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान

शरीरसंबंधांसाठी संमती वय 18 पेक्षा कमी नको; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट

१०…इंग्लंडविरुद्धच्या 4 थ्या कसोटीत जसप्रित बुमराह-सिराज ठरले निष्प्रभ, भारत बॅकफूटवर, पोप-रूटचे अर्धशतक; लंचपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 332 धावा

ऋषभ पंतमुळे कसोटी क्रिकेटमध्ये होणार ‘क्रांतिकारी’ बदल; सबस्टिट्यूट खेळाडूंच्या नियमाबाबत चर्चा सुरू; महत्त्वाची अपडेट आली समोर

१..मुसळधार पाऊस अन् वाहतूक कोंडी; मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा, एक तासाच्या प्रवासासाठी लागतायत अडीच ते तीन तास

२…राजस्थानमध्ये विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी

३..मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्याकडून सर्टिफिकेट

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!